माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येने उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर, अनेक ठिकाणी कलम 144 लागू आहे. यामुळे अनेक मोठे कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. यातच, बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत कानपूरमध्ये होणाऱ्या कथेसंदर्भात आपल्या भाविकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.
बाबा बागेशर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ जारी करत, सध्या उत्तर प्रदेशात कलम 144 लागू आहे. यामुळे सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच जनतेचे सहकार्यही आवश्यक आहे. उत्तर प्रदेशातील सद्यस्थिती पाहता, विश्वकल्याणाच्या दृष्टीने विचार करणे, हे प्रत्येक व्यासपीठाचे आणि आचार्यांचे कर्तव्य आहे, असे बाबा बागेशर यांनी म्हटले आहे.व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या निर्णयासंदर्भात बोलातना बाबा बागेश्वर म्हणाले, सध्या राज्यात 144 लागू असल्याने कानपूरमध्ये होणाऱ्या 5 दिवसीय हनुमंत कथा स्थगित करण्यात आली आहे. याच बरोबर, उत्तर प्रदेशात धार्मिक सलोखा कायम रहावा. कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत.
निर्माण झालेल्या या परिस्थितीत, आम्हाला वाटते की, राष्ट्र हितासाठी, तसेच उत्तर प्रदेशाचे उत्थान आणि हितासाठी हनुमान कथा पुढी काळासाठी पुढे ढकलायला हवी. यामुळे 17 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान होणारी श्री हनुमान कथा काही दिवसांसाठी स्थगितकरण्यात आली आहे.