शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

Lok Sabha Election 2024 : २५ वर्षांचा विक्रम मोडला! युसूफने लोकसभेचा गड जिंकला; अधीर रंजन चौधरी पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 5:46 PM

Baharampur Lok Sabha Result 2024 : युसूफ पठाणने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला.

Lok sabha Election Result 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवून युसूफ पठाणने ऐतिहासिक कामगिरी केली. मागील २५ वर्षांपासून विजयी होत असलेल्या उमेदवाराला पराभूत करण्याची किमया त्याने साधली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात होता. पश्चिम बंगालमधील बहरामपूर या जागेवरून त्याने नशीब आजमावले आणि यश संपादन केले. इथे काँग्रेस उमेदवार अधीर रंजन चौधरी आणि भाजप उमेदवार डॉ. निर्मल कुमार शाह यांच्याशी युसूफची लढत होती. पण, वर्षानुवर्षे निवडून येत असलेल्या अधीर रंजन चौधरी यांचा पराभव झाला आणि युसूफने खासदार होण्याचा मान पटकावला. 

दरम्यान, बहरामपूरमधील सात विधानसभा जागांपैकी सहा जागा टीएमसीकडे आहेत, तर एक जागा भाजपकडे आहे. त्यामुळे लोकसभेसाठी टीएमसीने नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला. मूळचा गुजरातचा असलेला युसूफ पठाण फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. पण, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचे आभार मानले होते. मुस्लिम मतदारांची संख्या पाहता टीएमसीने युसूफला लोकसभेच्या मैदानात उतरवले. 

बहरामपूर मतदारसंघातील जातीय समीकरणबहरामपूर लोकसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लीम, दोन्ही समुदायातील लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. २०१९ ची निवडणूक पाहिली तर या जागेवर १६ लाख ३२ हजार ८७ मतदार होते. त्यातील मुस्लीम मतदारांची संख्या तब्बल ८ लाख ४८ हजार इतकी होती. म्हणजे ५२ टक्के मतदार हे मुस्लीम समुदायातील होते. तर बहरामपूर लोकसभा जागेवर १३ टक्के एससी, १ टक्के एसटी मतदारही आहेत. 

ममता बॅनर्जींची खेळी यशस्वीपश्चिम बंगालमधील 'इंडिया' आघाडी तुटण्याचे कारण अधीर रंजन चौधरी असल्याचे बोलले जाते. त्यांच्यामुळेच काँग्रेस आणि टीएमसीमध्ये जागावाटपावर कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. अधीर रंजन चौधरी १९९९ पासून बहरामपूरचे खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या अपूर्ब सरकार यांचा पराभव केला. अधीर रंजन यांची त्यांच्या लोकसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे. टीएमसीने युसूफ पठाणला उमेदवारी देण्यामागील कारण म्हणजे बहरामपूर हा मुस्लिमबहुल भाग आहे. युसूफ पठाणला तिकीट देऊन टीएमसीने अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांना चांगले यश मिळाले. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालYusuf Pathanयुसुफ पठाणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४tmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेस