Bahraich Violence Case: भारतीय जनता पक्षाच्या माजी नेत्या नुपूर शर्मा पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी बहराइच हिंसाचाराचा उल्लेख केला. यावेळी त्या म्हणाल्या की, बहराइच हिंसाचारातील पीडित राम गोपाल मिश्रा यांच्यावर 35 गोळ्या झाडल्या. त्यांची नखे ओरबाडली, पोटे फाडले आणि त्यांचे डोळेही बाहेर काढण्यात आले.
नुपूर शर्मा भाषण करत होत्या, तेव्हा मंचावर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कलराज मिश्राही उपस्थित होते. नुपूर शर्मांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. याशिवाय, बहराइच पोलिसांनीही या दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले.
पोलीस काय म्हणाले?बहराइच पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले होते की, अशा अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. अशा अफवा पसरवू नका, असे निवेदन पोलिसांनी जारी केले आहे. रामगोपाल मिश्रा यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची क्रूरता झाली नाही. त्यांना फक्त गोळ्या मारण्यात आल्या.
नंतर मागितली माफी सोशल मीडियावर बराच गदारोळ झाल्यानंतर नुपूर शर्मांनी माफी मागितली. त्यांनी X वर लिहिले, “मी दिवंगत राम गोपाल मिश्रा यांच्याबद्दल सोशल मीडियावर जे ऐकले होते, तेच आपल्या भाषणात बोलले. मला पोस्टमार्टम रिपोर्टची माहिती नव्हती, त्यामुळे मी माझे शब्द परत घेते आणि माफी मागते.