शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 8:01 PM

गेल्या काही महिन्यांपासून लांडग्यांनी 9 मुले अन् एका महिलेचा जीव घेतला. याशिवाय, 50 हून अधिक लोकांना जखमी केले.

Bahraich Wolf Attack :उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात अनेक चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत अखेर संपली. टोळीतील शेवटचा लांडगा मृतावस्थेत आढळला. गेल्या अनेक दिवसांपासून या लांडग्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू होते. हा शेवटचा लांडगा मेल्यानंतर ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. आता लांडग्यांच्या दहशतीवर नियंत्रण येईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. 

सविस्तर माहिती अशी की, बहराइच जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून लांडग्याच्या टोळीने दहशत पसरवली होती. या टोळक्याने आतापर्यंत 9 लहान मुले आणि एका महिलेला आपली शिकार बनवले होते. तसेच, 50 हून अधिक लोकांना जखमी केले. यामुळे ग्रामस्थ मोठ्या दहशतीत जगत होते. वन विभाग गेल्या काही दिवसांपासून या लांडग्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण, लांडगे प्रत्येकवेळी हातावर तुरी देऊन निसटून जायचे.

लांडग्यांची दहशत कधी सुरू झाली?बहराइचच्या औरही गावातून लांडग्यांची दहशत सुरू झाली. येथे लांडग्यांनी पहिल्यांदा 7-7 वर्षांच्या दोन मुलांवर हल्ला केला. फिरोज नावाच्या मुलावर दोन महिन्यांपूर्वी लांडग्यांनी हल्ला केला होता. तो आईसोबत झोपला असताना रात्री बाराच्या सुमारास एका लांडग्याने घराच्या व्हरांड्यात घुसून त्याचा गळा पकडून ओढत नेले होते. त्याच्या आईने दोन्ही पाय धरुन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण लांडग्याने चिमुकल्याला सुमारे 200 मीटर शेतात ओढले. फिरोजचा जीव वाचला, पण लांडग्याने त्याच्या शरीराचे लचके तोडले होते. 

लांडग्याच्या नावाने मुलं थरथर कापतात

अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर वन विभागाने एक-एक करत लांडग्यांना पकडणे सुरू केले. 10 सप्टेंबर रोजी महसी येथे पाचवा नरभक्षक लांडगा पकडला गेला होता. पण, शेवटचा लांडगा मोकळा फिरत होता, त्यामुळे ग्रामस्थ अस्वस्थ होते. आता अखेर हा शेवटचा लांडगा मृतावस्थेत आढळल्यामुळे गावकरी चिंता मुक्त झाले आहेत. दरम्यान, गावातील मुलांमध्ये लांडग्यांची इतकी दहशत पसरली आहे की, लांडग्याचे नाव काढले तरी मुले थरथर कापतात. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू