ऑनलाइन लोकमतपाटणा, दि. 26 - बिहारमधील राजकीय घडामोडींना आता वेगळे ट्विस्ट आले आहे. बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना लगेच डिस्चार्ज देण्यात आला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज संध्याकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर काही तासानंतर राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्या नाकाला दुखापत झाल्यामुळे उपचारांसाठी त्यांना पाटणा येथील आयजीएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयातच रात्रभर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांना काही वेळातच डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपाने त्यांना बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, मुख्यमंत्री निवासात भाजपा आणि जदयूच्या आमदारांची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, नितीश कुमार सरकार स्थापनेसाठी दावा करणार असल्याची माहिती बिहार भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी दिली आहे. दुसरीकडे, मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार उद्या संध्याकाळी 5 वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे राजीनामा सोपवला. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांचे चिरंजीव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांच्या मुद्यावरुन नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंब्याची ऑफर दिली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचारापेक्षा अत्याचाराचा आरोप आहे.#FLASH Patna: Governor Keshari Nath Tripathi reaches Raj Bhavan after being discharged from hospital. pic.twitter.com/GpYogPTkgG
— ANI (@ANI_news) July 26, 2017