अयोध्या : कार्यकर्त्यांना रायफली, तलवारी आणि लाठी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्वयंसंरक्षण शिबिर’ आयोजित केल्याबद्दल स्थानिक कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री बजरंग दलाच्या ५० कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे अयोध्येतील शिबिरापाठोपाठ सुल्तानपूर, गोरखपूर, पिलीभीत, नोएडा आणि फतेहपूर येथे आयोजित वार्षिक स्वयंसंरक्षण शिबिरे गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यांच्यावर शांतता, कायदा आणि सुव्यवस्था तसेच जातील सलोखा बिघडवल्याचा आरोप आहे. बजरंग दलाने १० मे रोजी शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्यानंतर पोलिसांनी बेकायदेशीर कारवायांची दखल घेतल्याची माहिती फैजाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहित गुप्ता यांनी दिली. म्हणे, हिंदू समुदायाला धोकास्वयंसेवकांनी हाती रायफली, तलवारी आणि लाठ्या घेतल्याची छायाचित्रे सोशल मीडिया आणि वृत्त वाहिन्यांवरून दाखविण्यात आली होती. हिंदू समुदायाला धोका असून पोलीस आणि राजकारण्यांवर निर्भर राहता येत नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांना मार्शल आर्ट आणि शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे बजरंग दलाने स्पष्ट केले आहे. विहिंपची युवा शाखा असलेल्या कट्टरवादी बजरंग दलावर अल्पसंख्यकांविरुद्ध दंगल आणि हिंसाचार भडकविल्याचाही आरोप आहे. यापूर्वी या संघटनेने गाईच्या संरक्षणासाठी निगराणी कार्यक्रमही आयोजित केले होते. (वृत्तसंस्था)बजरंग दलाने युवकांमध्ये चारित्र्य आणि देशभावना बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यातील काही कार्यक्रम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आहेत. प्रशिक्षित लोक महिलांना मदत करतील. अन्य समुदायानेही त्याचे स्वागत करायला हवे. - रवी अनंत, विहिंपचे नेते.
बजरंग दलाची शिबिरे गोत्यात
By admin | Published: May 26, 2016 1:52 AM