"काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 06:36 PM2024-09-08T18:36:24+5:302024-09-08T18:37:44+5:30

Bajrang Punia Death Threat : कुस्तीपटू आणि काँग्रेसचे नेते बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Bajrang Punia Gets death threat by unknown person | "काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी

"काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी

Bajrang Punia : प्रसिद्ध कुस्तीपटू आणि काँग्रेसचे नेते बजरंग पुनिया यांना मेसेजवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवण्यात आला असून, या घटनेने खळबळ उडाली आहे. 

जिवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्यानंतर बजरंग पुनिया यांनी हरियाणातील सोनीपत बहालगढ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. 

बजरंग पुनियांना धमकी, मेसेजमध्ये काय म्हटले आहे?

काँग्रेस नेते बजरंग पुनिया यांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. मेसेजमध्ये म्हटले आहे की, "बजरंग, काँग्रेस सोड, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबासाठी चांगले होणार नाही. हा आमचा शेवटचा मेसेज आहे. निवडणुकीआधी आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो. जिथे तक्रार करायची, तिथे कर. हा आमचा पहिला आणि शेवटचा इशारा आहे."

कोणी दिली धमकी, पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांनी सांगितले की,बजरंग पुनिया यांना ज्या नंबरवरून धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे, तो परदेशातील आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास गांभीर्याने तपास करत आहोत आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी सर्व गोष्टी केल्या जातील. बजरंग पुनिया आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये केला प्रवेश

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार भरात असतानाच कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी कुस्तीपटू विनेश फोगाटसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विनेश फोगाटला जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर बजरंग पुनिया यांच्यावर किसान काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Web Title: Bajrang Punia Gets death threat by unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.