आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार बलजिंदर कौर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बलजिंदर कौर यांना त्यांच्या पतीने सर्वांसमोर कानशिलात लगावली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये आप आमदार बलजिंदर कौर आणि त्यांचे पती यांच्याशिवाय इतर काही लोक उभे आहेत, जे मध्यस्थी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ 10 जुलैचा आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओची तुफान व्हायरल झाली आहे.
आप आमदार बलजिंदर कौर यांच्यासोबत झालेल्या घटनेचा व्हिडीओ पंजाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष बरिंदर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ट्विट करताना बरिंदर यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आमदार बलजिंदर कौर यांना दिवसाढवळ्या कानशिलात मारण्यात आली हे आश्चर्यचकित करणारे आहे. पुरुषांची मानसिकता बदलावी लागेल. इतर काहीही बदलण्याआधी ही पुरुषप्रधान वृत्ती बदलली पाहिजे.
द ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेण्याचे सांगितले आहे. मी सोशल मीडियावर बलजिंदर कौरचा व्हिडीओ पाहिला आहे. समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या महिलेला तिच्याच घरात हिंसाचार सहन करावा लागत आहे, हे धक्कादायक आहे असं म्हटलं आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आप आमदार बलजिंदर कौर आणि त्यांचे पती यांच्यात काही मुद्द्यावरून वाद होत आहे. वाद वाढल्यावर आमदार पती सुखराज यांनी तिला सर्वांसमोर थप्पड मारली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बलजिंदर कौर पंजाबच्या तलवंडी साबोच्या आमदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा याच जागेवरून विजयी झाल्या. निवडणुकीत बलजिंदर कौर यांनी काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.