कपूरथला : पोलीस अधीक्षक बलजितसिंग हे सोमवारी गुरुदासपूर जिल्ह्णातील चकमकीत शहीद झाले. पंजाबमध्ये १९८४ साली दहशतवाद शिगेला पोहोचला असताना त्यांचे वडील पोलीस निरीक्षक आचारसिंग यांनी दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर १९८५ साली बलजितसिंग हे अतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक पदावर रूजू झाले होते.१९८४ साली अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या रस्ते अपघातात आचारसिंग यांचा मृत्यू झाला होता. बलजितसिंग हे फगवारा येथे पोलीस ठाण्याचे प्रमुख होते. सातव्या आयआरबी बटालियनमध्ये उप कमांडट होण्यापूर्वी ये मन्सा येथे दक्षता विभागात कार्यरत होते. बलजितसिंग यांच्या मृत्यूची वार्ता धडकताच त्यांच्या संतपुरा येथील निवासस्थानी शोककळा पसरली. पोलीस अधिकाऱ्यांसह विविध घटकांतील लोकांनी त्यांच्या घरी धाव घेतली होती. बलजितसिंग यांच्या पत्नी कुलवंत कौर हृदयरुग्ण असून त्यांना हे वृत्त सांगू नका अशी विनंती कुटुंबीयांनी केली होती. (वृत्तसंस्था)
हल्ल्यात शहीद झालेल्या बलजितसिंग यांच्या पित्याचेही हौतात्म्य
By admin | Published: July 28, 2015 3:37 AM