नवी दिल्ली : चेहऱ्याचा रंग उजळवण्याची जाहिरात करणाऱ्या सर्वच फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी मंगळवारी राज्यसभेत करण्यात आली. पक्षभेद विसरून सर्वच संसद सदस्यांनी फेअरनेस क्रीमसारखी उत्पादने आणि त्यांच्या जाहिराती महिलांसाठी मानहानीकारक असल्याची जोरदार तक्रार सभागृहात केली. काँग्रेसचे सदस्य विप्लव ठाकूर यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, फेअर अॅण्ड लव्हली आणि पॉण्ड्स फेसक्रीम यासारख्या उत्पादनांच्या जाहिराती महिलांसाठी मानहानीकारक आहेत. प्रत्येक क्रीम महिलांचा रंग उजळविण्याचा दावा करते. तथापि, या दाव्याची कधीही शहानिशा झालेली नाही. या जाहिरातींमुळे महिलांमध्ये न्यूनगंड तयार होत असल्याने त्या बंद करण्यात याव्यात आणि अशा क्रीम्सवर बंदी घालावी, असे त्या म्हणाल्या. ही उत्पादने बाजारात येण्यापूर्वी संबंधित संस्थांनी त्यांची तपासणी केली होती काय, अशा सवालही त्यांनी केला. या जाहिरातींमधून खोटे दावे केले जात असल्याची सरकारने दखल घ्यावी, असे ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्याला सर्वांचा पाठिंबा होता. फेन्सीडिल, कोरेक्स यासारख्या ब्रॅण्ड्ससह ४३९ औषधांच्या विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली असली तरी न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे यातील काही औषधे आजही बाजारात उपलब्ध आहेत, असे खते आणि रसायने मंत्री अनंत कुमार यांनी स्पष्ट केले. औषधांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर बंदीचा निर्णय घेण्यात आला. बंदी घातलेल्या ४३९ औषधांपैकी ३४४ औषधे निश्चित मात्रेच्या संयोगाची आहेत. यातील अनेक औषध उत्पादकांनी विविध उच्च न्यायालयांत धाव घेऊन बंदीवर स्थगिती आदेश मिळवला आहे. या औषधांवरील बंदीची शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी करता यावी यासाठी सरकार प्रयत्नशील असून न्यायालयाची स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे मंत्र्यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितले. औषधांच्या नमुन्यांची तपासणी करणारी केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संघटना स्वतंत्रपणे काम करते ती इतर कोणत्याही देशांतील नियामकांच्या शिफारशींचे अनुसरण करीत नाही. ही संघटना म्हणजे नियामक असून औषधांची तपासणी करणारे आमचे तज्ज्ञ आहेत, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)लोकप्रिय भारतीय ब्रॅण्ड्सची चीनमध्ये बेकायदा नक्कलभारतात उत्पादित होणाऱ्या अनेक लोकप्रिय उत्पादनांची हुबेहूब नक्कल करून ती नकली उत्पादने चीनच्या बाजारपेठांमध्ये विकली जात असल्याच्या घटना भारताच्या बीजिंग येथील वकिलातीच्या निदर्शनास आल्या आहेत. संबंधित कंपन्यांनी त्यांच्या कॉपीराइट/ट्रेडमार्कचा भंग झाल्याबद्दल औपचारिक तक्रारी केल्यानंतर भारतीय वकिलात या प्रकरणांचा पाठपुरावा चीनमधील सुयोग्य अधिकाऱ्यांकडे करीत आहे, अशी माहिती वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली.
सर्व प्रकारच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर बंदी घाला
By admin | Published: July 27, 2016 5:00 AM