शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

विमानात ई-सिगारेटच्या वापरावर बंदी

By admin | Published: November 01, 2016 5:46 AM

विमानातील केबिन सुरक्षेच्या दृष्टीने नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

नवी दिल्ली : विमानातील केबिन सुरक्षेच्या दृष्टीने नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केबिन सुरक्षेच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट हाताळण्यासंबंधीचे धोरण तयार करून इशारा देणारे फलक प्रसाधनगृह आणि विविध ठिकाणी लावले जावेत. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या कार्डावरही त्याबाबत सूचना केल्या जाव्यात, असे निर्देश डीजीसीएने घरगुती विमान कंपन्यांना दिले आहेत. आज मंगळवारपासून अंमलात आलेल्या केबिन सुरक्षा नियमावलीअंतर्गत कंपन्यांनी वॅलेट वा स्कॉय चेक अथवा बॅगमधून इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट काढून घेण्यासाठी प्रवाशांना सल्ला देणारी प्रक्रिया सुनिश्चित करावी, असेही डीजीसीएने म्हटले आहे. इलेक्ट्रॉनिक्स निकोटीन डिलेव्हरी सिस्टिम्स (ईएनडीएस) ही ई-सिगारेट नावाने प्रसिद्ध आहे. या सिगारेटची निर्मिती स्वादाचा तरल पदार्थ आणि निकोटीनच्या मिश्रणापासून केली जाते. ई-सिगारेट लिथियम बॅटरीद्वारे शिलगावली जाते. प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांना (क्रू) नकली धूम्रपान सामग्रीच्या उपयोगावर प्रतिबंध आहे. प्रवाशांना विमानात चढताना कंपनीने अशा प्रकारच्या कुठल्याही वस्तूंच्या उपयोगाला परवानगी देऊ नये, असे डीजीसीएने म्हटले आहे. अमेरिकन अन्न व प्रशासन विभागाने मात्र अद्याप धूम्रपान थांबविण्यासाठी कोणतेही नियमन अथवा प्रतिबंध अद्याप लावलेले नाही. आरोग्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामाबाबत उपयोगकर्ते आणि लोक अनभिज्ञ आहेत. डीजीसीएने म्हटले आहे की, ई-सिगारेट सुरक्षेच्या दृष्टीने आणि आरोग्यासाठी घातक आहे. त्याचा उपयोग होऊ नये तसेच विमानात योग्यरीत्या ठेवण्यासाठी कंपन्यांनी धोरण आणि प्रकिया निश्चित करावी. विमान कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट धोरणाची माहिती वेबसाईटद्वारे अथवा तिकिट खरेदी करताना प्रवाशांना द्यावी. नियमावली देशातील सर्व घरगुती विमान कंपन्यांना तसेच शासकीय विमान व सर्वसामान्य विमानांसाठी लागू राहील. ई-सिगारेट व्यतिरिक्त व्हेपोरायझर्स, वेप पेन्स, ई-हुक्का अथवा वेपिंग उपकरणांवर यापुढे बंदी राहील. (वृत्तसंस्था)