शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
3
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
4
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
5
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
6
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
7
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
8
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
9
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
10
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
11
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
12
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
13
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
14
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
15
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
16
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
17
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
18
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
19
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
20
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

अल्पवयीन मुस्लिम मुलीच्या विवाहास मनाई

By admin | Published: September 25, 2015 11:47 PM

मुस्लिमांनी आपल्या अल्पवयीन मुलींचा विवाह केल्यास त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक विशेष कायद्यानुसार (पीसीएमए) कायदेशीर कारवाई करता येईल

अहमदाबाद : मुस्लिमांनी आपल्या अल्पवयीन मुलींचा विवाह केल्यास त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक विशेष कायद्यानुसार (पीसीएमए) कायदेशीर कारवाई करता येईल. मुस्लिम वैयक्तिक कायदा नव्हे, तर केंद्रीय कायद्याचेच पालन केले जावे, असा निर्वाळा गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे. १८ वर्षांखालील मुस्लिम मुलीचा निकाह लावून देण्याला परवानगी देणारे तिचे आई-वडील किंवा अशा विवाहांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार काय? हा मुद्दा एका प्रकरणामुळे उपस्थित झाला होता. कारण शरियत कायद्यानुसार मुलगी वयात येताच किंवा १५ व्या वर्षी विवाहाची परवानगी दिली जाते. केंद्रीय कायद्याने बालविवाहाला बंदी घातली असून अल्पवयीन मुस्लिम मुलींचा निकाह लावून देणारे या कायद्यानुसार खटल्याच्या कारवाईस पात्र ठरतात, असे न्या. जे.बी. पार्डीवाला यांनी बुधवारी आदेशात स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)युनूस शेख याचे १६ वर्षीय मुस्लिम मुलीवर प्रेम होते. त्यांनी गेल्या वर्षी पळून जाऊन लग्न केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. न्या. पार्डीवाला यांनी मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील तरतुदी विचारात घेत मुलावर असलेले अपहरण, आमिष दाखविणे आणि बलात्काराचे आरोप वगळले होते. त्याचवेळी बालविवाह प्रतिबंधक कायदा मुस्लिमांना लागू होत असल्याचे स्पष्ट केले.