लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने मांसविक्री करणाऱ्या दुकानांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, आता शिक्षण संस्था, तसेच धार्मिक स्थळांपासून कमीत कमी ५0 मीटरच्या परिसरात मांसविक्री करता येणार नाही. धार्मिक स्थळांच्या प्रवेशद्वारापासून किमान १00 मीटर दूर अंतरावर मांसविक्रीची दुकाने असावीत, असे आदेश उत्तर प्रदेश सरकारने काढले. मशिदींच्या जवळही आता ही दुकाने असणार नाहीत. मशीदही हेही धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे मशिदीच्या प्रशासनाने मांसाच्या विक्रीचे परवाने देण्यात आले असले वा अशा दुकानांना परवानगी दिली असली, तरी त्यांनाही ती बंद करावी लागतील.
धार्मिक स्थळांजवळ मांसविक्रीला बंदी
By admin | Published: April 18, 2017 12:50 AM