ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. २५ - इसिस सारख्या दहशतवादी संघंटनाचा प्रभाव पडू नये तसे कट्टरतावादी विचारांचा फैलाव रोखण्यासाठी उत्तराखंडच्या रुरकी गावातील मदरशाकडून तेथे शिकणा-यांच्या मोबाईल व सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालींवर व त्यांच्या सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष ठेवावे असेही निर्देश मदरशातर्फे देण्यात आले आहेत. ही मुले भरकटून इसिस सारख्या दहशतवादी संघटनांच्या जाळ्यात अडकू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे मौलाना नवाब अली यांनी सांगितले.
तरूणांची दिशाभूल करण्यासाठी 'इसिस'कडून व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियाचा वापर केला जातो, तसेच मोबाईलद्वारेही तरूणांना जाळ्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईलचा वापर हा सर्रास कुठेही केला जात असल्याने त्याचाच फायदा दहशतवादी घेत आहेत. त्यामुळेच उत्तराखंडमधील मदरशाने हा निर्णय घेतला आहे.