नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली असून, या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू होईल. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या परदेश व्यापारी महासंचालकांनी याबाबतची अधिसूचना सोमवारी जारी केली. सर्व वाणांच्या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी १ जानेवारीपासून मागे घेण्यात येतं असल्याचा त्यात उल्लेख आहे. देशात कांद्याच्या किंमती कडाडल्याने सप्टेंबरमध्ये सरकारने निर्यातीवर बंदी घटली होती. देशात कांद्याचे भाव खाली यावेत, स्थिर राहावेत, हा त्याचा उद्देश होता. आता पुरेसा कांदा बाजारात आला असून, त्याचे भावही खाली आहेत. त्यामुळे निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे.