शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

‘त्या’ पॉर्न साईटवरील बंदी हटविली

By admin | Published: August 05, 2015 1:33 AM

सरकारने केवळ लहान मुलांसंबंधी अश्लील मजकूर असलेल्या वेबसाईटवरील बंदी कायम ठेवताना अन्य पॉर्न वेबसाईटवरील बंदी हटविण्याच्या निर्णयाची घोषणा

नवी दिल्ली : सरकारने केवळ लहान मुलांसंबंधी अश्लील मजकूर असलेल्या वेबसाईटवरील बंदी कायम ठेवताना अन्य पॉर्न वेबसाईटवरील बंदी हटविण्याच्या निर्णयाची घोषणा मंगळवारी केली आहे. अश्लील वेबसाईटसोबतच विनोदी मजकूर (फनी)असलेल्या सरसकट ८५७ वेबसाईटवर बंदी आणल्यानंतर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर सरकारने फेरआढावा घेताना हा निर्णय घेतला.दूरसंचार विभागाने इंटरनेट सेवादात्या कंपन्यांना (आयएसपी) बंदीचा आणण्याचा आदेश दिल्यानंतर काही विनोदी (फनी)वेबसाईटलाही या निर्णयाचा फटका बसला होता.काही वेबसाईटवर निव्वळ जोक्स किंवा विनोदी मजकूर असतानाही बंदी आणल्यामुळे सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सरकारने इंटरनेट सेन्सॉरशीप आणल्याचा आरोपही होऊ लागला होता. मंगळवारी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सारवासारव चालवताना तडकाफडकी उच्चस्तरीय बैठक बोलावत या निर्णयाचा फेरआढावा घेतला. दूरसंचार सचिव आर.एस. शर्मा, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी या बैठकीला हजेरी लावली. अश्लील सामग्री नसलेल्या वेबसाईट रोखल्या जाऊ नये, असा आदेश आयएसपींना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.रविशंकर यांचा खुलासायापूर्वीचा निर्णय मुळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार घेण्यात आला होता. याचिकाकर्त्यांने पुरविलेल्या पॉर्न साईटच्या यादीच्या आधारावर वेबसाईट रोखण्यात आल्या, असा खुलासा रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. इंटरनेटवरील संपर्कासंबंधी अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सोशल मीडियावर रोष व्यक्त करणाऱ्यांचे आम्ही अभिनंदनच करतो. सरकारनेच ‘ माय जीओव्ही’ हे संकेत स्थळ सुरू करताना जनतेच्या प्रतिक्रिया मागविल्या होत्या, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.दूरसंचार विभागाने ३१ जुलै रोजी नैतिकतेचा आदेश देताना हास्य मजकूर असलेल्या ९ जीएजी, कॉलेज ह्युमरसह प्ले बॉय आदी वेबसाईटवरही बंदी आणली होती. सरकारने अंतरिम उपाययोजना करताना मुलांसबंधी अश्लील मजकूर असलेल्या साईटवरील प्रतिबंध कायम ठेवला आहे.