नवी दिल्ली: मोदी सरकारनं काही दिवसांपूर्वीच पबजीसह ११८ ऍप्सवर बंदी घातली. देशात पबजी खेळणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. या बंदीमुळे पबजी खेळणाऱ्या अनेकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. मात्र आता पबजीवरील बंदी हटण्याची शक्यता आहे. पबजी हे दक्षिण कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडियोचं उत्पादन आहे. मात्र या गेमची फ्रेंचायजी चिनी कंपनी टेन्सेंटकडे होती. मात्र ब्ल्यू होल स्टुडियोनं टेन्सेंटकडे असणारी फ्रेंचायजी काढून घेतली आहे. आता हा गेम पूर्णपणे दक्षिण कोरियन झाला आहे. त्यामुळेच पबजीवरील बंदी हटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रिलायन्स जियोला डिस्ट्रिब्युशनचं काम मिळणार?ब्ल्यू होल स्टुडियोच्या एका ब्लॉगपोस्टमधून कंपनीची जियोसोबत बोलणी सुरू असल्याचं समोर आलं आहे. ब्ल्यू होल स्टुडिओ कंपनी जियोला डिस्ट्रिब्युशनचं काम देऊ शकते. याबद्दलच्या करारासाठी सध्या प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू आहे. त्यामुळे अधिकृत निर्णय येण्यास काही दिवसांचा अवधी लागेल.शानदार! जबरदस्त!! २० दिवस भारतीय जवानांनी गाजवले; चीनला दणकाचिनी ऍप्सवर मोदी सरकारची बंदीपबजीसह ११८ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं २ सप्टेंबरला घेतला. या ऍप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला जातो. त्यामुळे वापरकर्त्यांसोबतच देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असं सरकारनं ऍप्स बंदीचा निर्णय जाहीर करताना सांगितलं. बंदी घालण्यात आलेल्या ११८ ऍप्समध्ये काही लोकप्रिय ऍप्सचाही समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकप्रिय झालेल्या ल्युडो, कॅरम या ऍप्सवरही सरकारनं बंदी घातली.केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका; आता पूर्वपरवानगीशिवाय कंपन्या करु शकणार कपातटिकटॉकही बंदीचा कारवाईपबजीसह ११८ ऍप्सवर बंदीची कारवाई करण्याआधी मोदी सरकारनं ५९ चिनी ऍप्सवर बंदीचा निर्णय घेतला होता. या ५९ ऍप्समध्ये लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ मेकिंग ऍप टिकटॉकचाही समावेश होता. गेल्या पाच महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. चीनकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सरकारनं चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
मोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार?; जियो लवकरच मोठा करार करण्याच्या तयारीत
By कुणाल गवाणकर | Published: September 20, 2020 11:24 PM