चंदीगड : चंदीगडच्या डिस्कोंमध्ये तोकड्या कपड्यांतील महिलांचा वावर वाढल्यामुळे चिंतेत पडलेल्या प्रशासनाने तेथे शॉर्ट स्कर्टवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे डिस्कोमध्ये महिलांनी तोकडे किंवा असभ्य वाटणारा पेहराव करण्याला मुभा दिली जाणार नाही. सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवण्यासंबंधी २०१६ च्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे एका आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले. या आदेशाच्या माध्यमातून प्रशासनाने शहरातील वाढत्या ‘नाईटलाईफ’ संस्कृतीवर आळा घालण्याचे प्रयत्न चालविले आहेत. शहरातील बार आणि डिस्कोमधूनच देशविरोधी घटकांचा जन्म होतो, असे प्रशासनाला वाटते. १ एप्रिलपासून हे धोरण अमलात आणण्यात आले असून बारची वेळही मध्यरात्री १२ पर्यंत म्हणजे दोन तासांनी कमी केली आहे. बारमालक, डिस्कोचालकांच्या मुसक्या बांधण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठे अधिकार बहाल करण्यात आले. ही स्थिती अभूतपूर्व मानली जाते. (वृत्तसंस्था)
चंदीगडच्या डिस्कोत ‘शॉर्ट स्कर्ट’वर बंदी
By admin | Published: April 21, 2016 3:33 AM