नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजवरही बंदी घालण्याचे आदेश शनिवारी दिले. ही वेब सीरिज तयार करणाऱ्या इरॉस नाऊ या कंपनीला निवडणूक आयोगाने तसे कळवले आहे.‘मोदी : जर्नी आफ अ कॉमन मॅन’ असे या वेब सीरिजचे नाव असून, ती पाच भागांची आहे. ती कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित करू नका, असे निवडणूक आयोगाने इरॉस नाऊ या कंपनीला बजावले आहे. सर्व वेब सीरिज आॅनलाइनच दाखविल्या जातात. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे या वेब सीरिज दाखविता येणार नाही. ही पाच भागांची मालिका, तसेच मालिकेशी संबंधित कोणताही भाग दाखवायलाही निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.
नरेंद्र मोदींवरील वेब सीरिजवरही बंदी; निवडणूक आयोगाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 06:51 IST