केळी संशोधन केंद्रास ५२ एकर जागा
By admin | Published: April 19, 2016 11:22 PM
विविध प्रकल्प प्रस्तावित
विविध प्रकल्प प्रस्तावितकेळी संशोधनावर आधारित प्रात्यक्षिक प्रयोगशाळा, प्रशिक्षण हॉल, माहिती घेण्यासाठी व प्रशिक्षणासाठी येणार्या शेतकर्यांसाठी निवासाची व्यवस्था, शेतकर्यांचा कल टिश्यूकल्चर केळी रोपांकडे वाढला आहे. हे लक्षात घेऊन टिश्यू संशोधन व ते अनुदानावर उपलब्ध करून देणे, ज्या टिश्यू रोपाची बाजारात किंमत १२ रूपये आहे ते सहा रूपयांपर्यंत उपलब्ध करून देणे, निर्यातक्षम रोपांची निर्मिती करून त्याच्या लागवडीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहित करणे यासह विविध कामे या केंद्राच्या माध्यमातून होणार आहेत. महत्वाकांक्षी प्रकल्पउच्च तंत्रज्ञानावर आधारित केळी संशोधन व गुणवत्ता केंद्राचा जिल्ातील केळी उत्पादकांना मोठा लाभ होणार आहे. त्याची लवकरात लवकर उभारणी होऊन केळी उत्पादकांना त्याचा लाभ व्हावा असे प्रयत्न आहेत. - एकनाथराव खडसे, महसूल, कृषी मंत्री.