शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणींवर यमुना कोपली; चौघांचे मृतदेह सापडले; ८ जण बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 7:39 AM

ही नाव मरका येथून फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाट येथे जात होती.

बांदा (उत्तर प्रदेश) : रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना नदीच्या मधोमधच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट बुडाली. यामुळे बोटीतील ३५ जण बुडाले असून, यात चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत. अनेकजण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील मरका भागात गुरुवारी ही दुर्घटना घडली, अशी माहिती पोलिसांना दिली.

ही नाव मरका येथून फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाट येथे जात होती. नावेत ३० ते ३५ लोक होते, असे पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांची मदत घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. सात ते आठ लोक पोहून किनाऱ्यावर पोहोचले. तथापि, अनेकजण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले.

असा घडला प्रसंग...

ज्यावेळी बोट नदीच्या मधोमध पोहोचली त्यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे हलू लागली. बोटीतील लोक घाबरून इकडे तिकडे जाऊ लागले. बोटीत एकाच बाजूला लोकांची संख्या वाढल्याने अचानक बोट उलटली. काही लोक पोहायला लागले. मात्र, महिला आणि मुले बुडू लागली. नदीच्या मध्यभागी बोट बुडाल्याने ते वाहून जात होते.  यावेळी २ बोटी मदतीला आल्या. त्यांनी काही लोकांना वाचवले. मात्र, या घटनेत अनेक महिला आणि मुले वाहून गेली.

प्रशासनाला मदतीचे आदेश

चार मृतदेह हाती लागले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने दुर्घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्याची देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत.

बोट २० जणांची, बसले ३५

बेपत्ता लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेत अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. या बोटीची बसण्याची क्षमता २० होती. मात्र, या बोटीत ३५ जणांसह  मोटारसायकलही भरल्या होत्या. त्यामुळे बोट बुडाली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

आम्ही आमच्या गावातून पत्नीला घेऊन तिच्या आई्-वडिलांच्या घरी राखी बांधायला निघालो होतो. आम्ही नदीच्या काठावर पोहोचलो तेव्हा एकच बोट होती. त्यामुळे एकाच वेळी ३५ जण बोटीत चढले. यावेळी बोटीवर काही मोटारसायकलही ठेवल्या होत्या.- दुर्घटनेतून बचावलेला प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूriverनदीRaksha Bandhanरक्षाबंधन