श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. शुक्रवारी (21 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. परिसरात दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्रीपासून शोपियान जिल्ह्यातून चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस बेपत्ता होण्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. संशयित दहशतवाद्यांनी या चार पोलिसांचं अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून 4 पोलिसांचं अपहरण