बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरूत सोशल मीडियावरील एका पोस्टवरून हिंसाचार झाला आहे. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर जमावाने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरदेखील जमावाने हल्ला केला. यामध्ये 60 पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता तब्बल 110 जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
बंगळुरू शहराचे पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने बंगळुरूत वादंग माजला आहे. नवीन असं वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये रात्रीच्या सुमारास जमावाने मूर्तींच्या घरावर दगडफेक केली. यावेळी परिसरात आग लावण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस मूर्तींच्या घराजवळ पोहोचले. त्यामुळे जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. याशिवाय जाळपोळदेखील केली. जमाव प्रक्षुब्ध झाल्यानं पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
श्रीनिवास मूर्तींच्या घरासोबतच जमावाने बंगळुरू पूर्वेला असलेल्या के. जे. हाली पोलीस ठाण्यावरही हल्ला केला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. यानंतर परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 110 जणांना अटक करण्यात आली असून आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो
लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात
बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले
यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
तैवानच्या हद्दीत घुसले, मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळाले
शिकागोमध्ये हजारो लोकांनी केली लूटमार; 100 जणांना अटक, 13 अधिकारी जखमी