ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या वाद निर्माण झाला आहे. खासकरून शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्याला पाठिंबा दर्शवणारे ट्विटर ट्रेण्ड यांमुळे ट्विटरने भारताची नाराजी ओढवून घेतली आहे. या पार्श्वभूमीवर“ट्विटर’ या अमेरिकी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला पर्याय शोधण्याचा प्रयत्न सरकार पातळीवर सुरू होताच. त्यातूनच ‘कू’ या नव्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा शोध लागला आहे. केंद्रीय पातळीवरून त्याची जोरदार पाठराखण सुरू आहे. पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद यांच्यासारखे मंत्रिगण तर आता ‘कू’वरूनच ‘ट्विट’ करू लागले आहेत. जाणून घेऊ या नव्या ॲपविषयी...‘कू’ची निर्मिती कोणी केली?बंगळुरूस्थित स्टार्ट-अपचे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी ‘कू’ची निर्मिती केली. तेच ‘कू’चे सीईओही आहेत. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे पदवीधर असलेल्या राधाकृष्ण यांनी मार्च, २०२० मध्ये ‘कू’ची सुरुवात केली. ट्विटरहून १४ वर्षांनी लहान आहे ‘कू’.‘कू’चे वर्णन...गुगल प्ले स्टोअरवर ‘कू’ने स्वत:चे वर्णन ‘वैयक्तिक मते तसेच विचारांचे आदानप्रदान करणारे मायक्रोब्लॉगिंग व्यासपीठ’, असे केले आहे.भारतीयांना आपल्या मातृभाषेत विविध विषयांवर मुक्तपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देणारे व्यासपीठ असेही ‘कू’ ने स्वत:बद्दल जाहीर केले आहे.कोण कोण यूझर्ससद् गुरू, माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि जवगल श्रीनाथ यांसारखे मान्यवर ‘कू’चा वापर करतात. निती आयोगानेही ‘कू’वर आपले अकाऊंट उघडले आहे.प्रथमदर्शनी कसे आहे ‘कू’?ट्विटरवर असलेले सर्व फीचर्स ‘कू’वरही उपलब्धमजकुराव्यतिरिक्त व्हिडीओ आणि ऑडिओ मेसेजसही शेअर करता येतातअडचण काय?ज्यांनी हे ॲप डाउनलोड केले आहे त्यांनी त्यावर ओटीपीची अडचण येत असल्याचे नमूद केले आहे. त्यातून लवकरच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन ‘कू’कर्त्यांनी दिले आहे.‘मन की बात’ मध्येही उल्लेखपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्येही ‘कू’वर कौतुकाचा वर्षाव केला होता. केंद्र सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर ॲप इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत ‘कू’ने प्रथम क्रमांक पटकावला होता.भारतातील यूझर्सटि्वटर १,८९,००,०००कू २५,००,०००
ट्विटरला भारतीय पर्याय... ‘कू’! जाणून घ्या कूबद्दल ए टू झेड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 5:02 AM