बंगळुरुहून थेट कोप्पलू गावात, 'त्या' बापमाणसाला युवक काँग्रेसकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:18 AM2021-06-02T08:18:05+5:302021-06-02T08:18:39+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील कोप्पलू गावात ही घटना घडली. कोप्पालू गावात राहणाऱ्या आनंद (45) यांनी त्यांच्या दहा वर्षीय मुलाला लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून थेट बंगळुरू गाठलं

From Bangalore directly to Koppalu village, a helping hand from the Youth Congress to that father who drive cycle for son | बंगळुरुहून थेट कोप्पलू गावात, 'त्या' बापमाणसाला युवक काँग्रेसकडून मदतीचा हात

बंगळुरुहून थेट कोप्पलू गावात, 'त्या' बापमाणसाला युवक काँग्रेसकडून मदतीचा हात

Next
ठळक मुद्देयुवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद यांना औषधे आणि काही प्रमाणात धान्य देऊन त्यांची मदत केली. विशेष म्हणजे मदतीसाठी हे कार्यकर्ते बंगळुरूवरुन कोप्पालू या गावी पोहोचले. 

बंगळुरू - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्येने पावणेतीन कोटींचा आकडा पार केला आहे. तर, या महामारीच्या संकटात देशभरात आत्तापर्यंत तब्बल 3,31,895 लोकांना जीव गमवावा लागला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने सुख-दुख, हाल-अपेष्टा, संकटं अन् संकटावर मात करणारी अनेक उदाहरणे आपल्यासमोर ठेवली आहेत. अशीच एक बापलेकाची भावूक घटना समोर आली आहे. लेकाचा जीव वाचवण्यासाठी एका पित्याने सायकलवरून तब्बल 300 किमीचा प्रवास केला. याबाबतचे वृत्त माध्यमात झळकताच युवक काँग्रेसने पित्याच्या मदतीला धावून आली.   

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील कोप्पलू गावात ही घटना घडली. कोप्पालू गावात राहणाऱ्या आनंद (45) यांनी त्यांच्या दहा वर्षीय मुलाला लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून थेट बंगळुरू गाठलं. साधारण 300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरुन केला आणि मुलासाठी औषध आणलं. आनंद सांगतात की, माझा मुलगा आजारी आहे. मला औषधासाठी सायकलने जावे लागले. बर्‍याच ठिकाणी औषध शोधले. पण ते उपलब्ध नव्हतं. त्यामुळे सायकलने जाण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात.  

कोरोना आधी दर दोन महिन्यांनी आनंद बंगळुरूला जाऊन ते औषध आणत असत. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे घरामध्ये असलेलं औषध संपलं. मुलाचा जीव वाचवण्यासाठी औषध महत्त्वाचं असल्याने आनंद यांनी सायकलवरुन बंगळुरूला जाण्याचा निर्णय पक्का केला. 23 मे रोजी ते बंगळुरूला जाण्यासाठी निघाले आणि त्यानंतर 26 मे रोजी तिथून परत आले.

आनंद यांच्या प्रवासाची कथा माध्यमात आल्यानंतर युवक काँग्रेसने त्यांच्या कोप्पालू या गावी जाऊन त्यांना मदत केली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद यांना औषधे आणि काही प्रमाणात धान्य देऊन त्यांची मदत केली. विशेष म्हणजे मदतीसाठी हे कार्यकर्ते बंगळुरूवरुन कोप्पालू या गावी पोहोचले. 


कोरोना महामारीच्या संकटात माणूसकीचे मोठे दर्शनही घडले आहे. कुठे माणूसकी हरवल्याचं पाहायला मिळालं, तर कुठे माणूसकीची अने उदाहरणे ही कायमची आदर्श बनली आहे. कोरोनामुळे आपण खूप काही गमावलंय, पण कोरोनाने बरंच काही शिकवलंयही. 

मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मे महिना सर्वात धोकादायक ठरला आहे. नवीन रुग्ण आणि मृतांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. फक्त मे महिन्यात कोरोनाच्या 90.3 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महिन्याच्या शेवटी थोडासा दिलासा मिळाला. मात्र तरीही एप्रिलच्या तुलनेत 30% जास्त आहे. एप्रिल महिन्यात एकूण 69.4 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तसेच मे महिन्यात जवळपास एक लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा खूपच जास्त असून एप्रिलच्या तुलनेत अधिक आहे.

Web Title: From Bangalore directly to Koppalu village, a helping hand from the Youth Congress to that father who drive cycle for son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.