शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

बंगळुरूत मेट्रोने प्रवास करणाऱ्यांचे झाले हाल

By admin | Published: July 07, 2017 4:09 PM

बंगळुरूमध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यां प्रवाशांचे शुक्रवारी सकाळी चांगलेच हाल झाले.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 7- बंगळुरूमध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यां प्रवाशांचे शुक्रवारी सकाळी चांगलेच हाल झाले. तेथिल मेट्रो कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बंगळुरू मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी मेट्रो सेवा बंद करून शुक्रवारी सकाळपासून निदर्शनं केली. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या नियोजीत ठिकाणी पोहचायला समस्यांचा सामना करावा लागला. मेट्रोने प्रवास करणाऱ्या चार लाख प्रवाशांना या निषेधाचा फटका बसला. ज्या प्रवाशांना मेट्रो बंदीबद्दल माहिती मिळाली त्यांनी खाजगी गाड्यांचा वापर करून प्रवास केला. 
 
बंगळुरू मेट्रोचे कर्मचारी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. तसंच त्यांची सुटका होइपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला. दररोज सकाळी पाच वाजता बायपनहळ्ळी, नागसारडा, मयूर रोड आणि येलचेनहळ्ळी या मार्गावरून मेट्रोच्या गाड्या सुरू होतात.  पण आज मात्र कर्मचाऱ्यांनी मेट्रो रेल्वे स्थानकावरचं शटर बंद केले आहे. नम्मा मेट्रोचं जाळं शहरात सुमारे ४२ किमी पसरलेले आहे. या मेट्रोवर सुमारे चार लाख प्रवासी अवलंबून आहेत.
 
सकाळी आठ वाजता मी महालक्ष्मी मेट्रो स्टेशनवर पोहचलो तेव्हा मेट्रो बंद असल्याची माहिती मला मिळाली होती. म्हणूनच ऑफिसला मी कॅबने गेलो, अशी माहिती एका प्रवाशाने दिली आहे. हजारो लोकांना मेट्रो सर्व्हिस बंद असण्याचा फटका बसल्याचं त्या प्रवाशाने सांगितलं.
 
आणखी वाचा
 

कर्जमाफी योजना फसवी - अजित पवार

चीनच्या मुद्द्यावर तुम्ही शांत का ? राहुल गांधींचा मोदींना सवाल

गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी शांताराम नाईक यांची नियुक्ती

"मेट्रो कर्मचारी आणि कर्नाटक स्टेट इंडस्ट्रीअल सिक्युरिटी पर्सोनेल यांच्यात गुरुवारी बाचाबाची झाली. यानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांपैकी काहींना अटक झाली होती. म्हणूनच कर्मचारी आपल्या या सहकाऱ्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. यातून तोडगा काढण्चाचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली आहे. 

 
याप्रकरणातील  पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना तसंच मेट्रो कर्मचाऱ्यांशी बाचाबाची करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केल्याची माहिती, अतिरिक्त पोलीस आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी दिली आहे. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने ही सविस्तर माहिती दिली आहे.