Bangladesh PM Sheikh Hasina : बांग्लादेशात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले आरक्षणविरोधी आंदोलन आणखी तीव्र झाले. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आज(दि.5) आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडून भारतामध्ये आश्रय घेतला. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांनी यावरुन मोठे विधान केले आहे.
1 कोटी निर्वासित बंगालमध्ये येणारपश्चिम बंगाल विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, "बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार सुरू आहे. रंगपूर येथे नगर परिषदेचे नगरसेवक हरधन नायक यांची हत्या करण्यात आली, सिराजगंज पोलिस ठाण्यात 13 पोलिसांची हत्या करण्यात आली होती. यापैकी 9 हिंदू होते. नोआखलीमध्येही हिंदूंची घरे जाळण्यात आली. येत्या काही दिवसांत 1 कोटी हिंदू निर्वासित पश्चिम बंगालमध्ये येतील. मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल यांना या प्रकरणी केंद्र सरकारशी त्वरित बोलण्याची विनंती करतो."
बांग्लादेश जमात आणि कट्टरतावाद्यांच्या हातात- सुवेंदू अधिकारीसीएएचा संदर्भ देताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, "बांगलादेशातील हिंसाचारात मृतांचा आकडा 300 वर पोहोचला आहे. आरक्षणाच्या मागणीने सुरू झालेले आंदोलन सरकार बदलण्याच्या मागणीवर आले. परिस्थिती तीन दिवसांत आटोक्यात आली नाही, तर बांग्लादेश जमात आणि कट्टरवाद्यांच्या हातात जाईल.
आंदोलक आणि सरकार समर्थकांमध्ये संघर्षबांग्लादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलक आणि सरकार समर्थकांमध्ये जोरदार चकमक झाली. दोन गटांतील संघर्षात आतापर्यंत 300 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. मारले गेलेले बहुतांश पोलीस आहेत. आंदोलकांनी पोलीस ठाणे, पोलीस चौकी, सत्ताधारी पक्षाची कार्यालये आणि त्यांच्या नेत्यांच्या निवासस्थानांवरही हल्ला केला आहे.