कोलकाता : मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपाखाली कोलकाताच्या कोर्टाने जमात- ऊल- मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेच्या बांगलादेशी दहशतवाद्यासह दोघांना दोषी ठरविले. यात एका भारतीय नागरिकालाही दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना १७ मार्च रोजी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे.मनी लाँड्रिंग कायद्यातील कठोर तरतुदीतहत विदेशी नागरिकाला दोषी ठरविण्यात आल्याचे हे दुसरे प्रकरण आहे. २०१७ मध्ये बंगळुरू कोर्टाने अल-बद्र संघटनेच्या पाकिस्तानी दहशतवाद्याला मनी लाँड्रिंगविरोधी कायद्याखाली दोषी ठरविण्यात आले होते. या कायद्याखाली दोषी ठरविण्यात आल्याचे देशातील हे दहावे प्रकरण आहे. २००२ मध्ये हा कायदा करण्यात आला होता. कर चुकवेगिरी आणि काळा पैसा तयार करणे, या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी २००५ पासून हा कायदा लागू करण्यात आला. रहमतउल्लाह ऊर्फ साजीद हा बांगलादेशी नागरिक असून, जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेचा सदस्य आहे. त्याच्यासह भारतीय नागरिक मोहंमद बुºहानला काळा पैसा प्रतिबंधक कायद्यातील कलम ३ अन्वये कोलकाताच्या शहर सत्र न्यायालाने दोषी ठरविले.२०१४ मध्ये राष्टÑीय तपास संस्थेने (एनआयए) या दोघांना आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध आणि स्फोटक पदार्थ कायद्यातहत गुन्हा दाखल केला होता.त्यावर्षी २ आॅक्टोबर रोजी प. बंगालमधील बर्धवान शहरातील खगरागढ वस्तीतील एका घरात स्फोट झाला होता.यात दोन जण ठार, तर अन्य काही जण जखमी झाले होते. नोव्हेंबर २९१८ मध्ये ईडीच्या कोलकाता विभागाने आरोपपत्र दाखल केले होते.
‘जेएमबी’च्या बांगलादेशी दहशतवाद्यासह दोन दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 2:07 AM