शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; पदवीधारक हवे आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 4:05 PM

Bank of Baroda Recruitment 2020-21: एलआयसी, BECIL एम्स नंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर पदांवर अर्ज मागविलेले आहेत.

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी  २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 

BOB Recruitment 2020-21: पदांची संख्याबँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट अधिकारी (Recruitment of Specialist Officers) च्या एकूण 32 जागा भरायच्या आहेत. यामध्ये २७ पदे सिक्युरिटी ऑफिसर तर ५ पदे फायर ऑफिसर (Fire Officers) ची आहेत. 

Bank Of Baroda Job Vacancy शैक्षणिक अटBOB Recruitment 2020-21 नुसार सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तर फायर ऑफिसरसाठी उमेदवाराकडे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (NFSC) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालयाच्या सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग किंवा फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंगची डिग्री असणे आवश्यक आहे. 

अर्ज शुल्कया पदांवर सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना 600 रुपये तर एससी/एसटीच्या उमेदवारांना 100 रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे. 

How to Apply for BOB Recruitment: अर्ज कसा कराल?

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट bankofbaroda.co.in वर जा...
  • होम पेजवर करिअर लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा...
  • Bank of Baroda Career Details पेजवर नोटिफिकेशन दिसेल..
  • त्यावर Link to Apply वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता.  

LICHFL Vacancy 2020: जीवन बीमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनीपासून  असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांचे वार्षिक पे स्केल १४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. 

जर तुम्ही एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री घेतली असेल  तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या पदांवर अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली जात आहे. LIC मध्ये भरती; विना परिक्षा होणार निवड, 14 लाखांपर्यंतचे पॅकेज

 

ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये भरती

Sarkari Job Vacancy 2020: ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये नॉन फॅकल्टी ग्रुप बी व सीच्या शेकडो पदांवर भरती काढण्यात आली आहे. यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांची भोपाळच्या एम्समध्ये (AIIMS Bhopal) नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती वेगवेगळ्या पदांवर केली जाणार असून १० वी पास ते पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या पदभरतीची नोटीस बेसिलने वेबसाईटवर जारी केली आहे. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही १० डिसेंबरपासून सुरु झाली आहे. याच्या लिंक बातमीच्या खाली देण्यात येत आहेत. 

पदांची एकूण संख्या - ७२७

पदे कोणती? कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, स्टेनोग्राफर, अपर व लोवर डिव्हिजन क्लार्क, स्टोअर कीपर, एडमिन ऑफिसर, असिस्टेंट इंजीनियर, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्रेरियन, मॅनेजर, डाएटीशियनसह अनेक पदांवर जागा भरण्यात येणार आहेत. कोणत्या पदासाठी शिक्षण, वयाची अट आदी माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

Government Jobs: कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, क्लार्क, नर्ससाठी शेकडो पदांवर भरती; केंद्र सरकारी नोकरीची संधी

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रjobनोकरी