नबीन सिन्हा, नवी दिल्लीकाळ्या पैशांबाबत आता कोणत्याही सौम्यतेची शक्यता फेटाळून लावताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले की, धर्मादाय विश्वस्त किंवा मंदिरांना दान देणाऱ्यांचा कदापि पाठीशी घालण्यात येणार नाही. अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत बोलताना जेटली म्हणाले की, पाचशे व हजारच्या नोटांबाबतचा सरकारचा निर्णय हा काळा पैसा, बनावट नोटा, मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला पुरविला जाणारा निधी यांच्यावर अंकुश लावण्यासाठी आहे. अडीच लाखांपेक्षा कमी रक्कम जमा करणाऱ्यांना त्रास देण्यात येऊ नये, अशा सूचना बँक अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी सरकारने मोठी तयारी केली आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांनाच याबाबत कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
बँकेत भरता येईल अडीच लाखांपर्यंत रक्कम!
By admin | Published: November 11, 2016 6:22 AM