भोपाळ : मध्य प्रदेशातील राज्य सरकारच्या वेतन योजनेद्वारे सूट मिळल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून ट्रांजेक्शन चार्ज म्हणून 59 रुपयांची कपात केल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलने बँक प्रशासनाला हलवून सोडले आहे. हेड कॉन्स्टेबल यांनी फक्त याप्रकरणी बँकिंग लोकपालचा दरवाजा खटखटवला नाही, तर त्यांनी बँकेला पैसे परत करण्यास भाग पाडले आहे.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर मध्य प्रदेशातील पोलीस मुख्यालयाने सुद्धा याची चौकशी सुरु केली आहे. कारण राज्यातील इतर 50 हजार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अशा प्रकार घडला आहे की नाही, याची खात्री केली जाणार आहे. पोलीस महानिरीक्षकांकडून (वेलफेअर) सर्व पोलीस युनिट्सला पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याची तपासणी करुन पाहावे की त्यांच्या खात्यातून पैसे कापले आहेत की नाही. ट्रांजेक्शनच्या नावाखाली पैसे कापण्याची तक्रार येत असेल तर युनिट हेडची जबाबदारी आहे की, संबंधित बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधून वेतन योजनेचा लाभ पोलीस कर्मचाऱ्यांना देण्याचा आहे, असे पोलीस महानिरीक्षकांनी म्हटले आहे.
दरम्यान, तुम्ही बँकेत जाऊन 59 रुपये का कापले, असा जाब विचारला असता काय? कोण करणार नाही. कारण मी पण केले नसते. मात्र, एकाच दिवशी असे दुसऱ्यांदा झाले, त्यामुळे याची चौकशी करण्याचा मी निर्णय घेतला, असे या हेड कॉन्स्टेबलने सांगितले. तसेच, या हेड कॉन्स्टेबलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिले असून म्हटले आहे की, अशाप्रकारे पैसे कापल्यानंतर कोटींमध्ये पैसे जमा होतील.