शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

अर्थसंकल्पादरम्यान बँक कर्मचारी जाणार संपावर

By admin | Published: February 05, 2015 2:37 AM

दीर्घकाळापासून प्रलंबित पगारवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटना पुन्हा एकदा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत.

नवी दिल्ली : दीर्घकाळापासून प्रलंबित पगारवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटना पुन्हा एकदा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. भारतीय बँक महासंघाने दिलेल्या प्रस्तावावर असमाधानी असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटनांनी २५ फेब्रुवारीपासून चार दिवसांच्या संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.भारतीय बँक महासंघाने पगारवाढीचा आपला प्रस्ताव ११ टक्क्यांवरुन १२.५ टक्के आणि आज १३ टक्क्यांवर नेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, येत्या २८ फेब्रुवारी रोजी २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स अर्थात यूएफबीयूचे समन्वयक एम.व्ही. मुरली यांनी सांगितले की, ‘भारतीय बँक महासंघाने आज वेतनवाढीत केवळ अर्ध्या टक्क्याने वाढ करून ती १३ टक्के केली आहे. हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही.’ कामगार संघटनांनी वेतनात १९ टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे.नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्सचे महासचिव अश्विनी राणा यांनी सांगितले की, बँक कर्मचारी २५ ते २८ फेब्रुवारी या काळात संपावर जातील, यावर सर्वांची संमती झाली आहे. दरम्यान, हा चारदिवसीय संप झाल्यास केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तोंडावर सरकारी निधी हस्तांतरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)