ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१- विजय मल्ल्यांनी सर्वोच्च न्यायालयात आज प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्या प्रतिज्ञापत्रात बँकेला माझी मालमत्ता जाणून घेण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विजय मल्ल्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावला असतानाच विजय मल्ल्यांनी या सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. याआधी सक्तवसुली संचलनालयानं विजय मल्ल्यांना देशातून निष्कासित करा, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती. मनी लाँड्रिंगमध्ये 9 हजार कोटींचा घोटाळा आणि आयडीबायकडून खोटी माहिती देऊन कर्ज घेतल्याप्रकरणी त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्रात सादर केलं आहे. सक्तवसुली संचलनालयानं पराराष्ट्र मंत्रालय आणि सीबीआयनं इंटरपोलला राज्यसभेचे खासदार विजय मल्ल्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयानं मल्ल्यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द केला होता. विजय मल्ल्यांचं पासपोर्ट का रद्द करू नये याचं उत्तर मल्ल्यांकडून ईडीला अपेक्षित त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.