नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या या काळात कोणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवण्यात आल्या आहेत. बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.
बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण मे महिन्यात तब्बल 12 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात 12 दिवस बँक बंद राहणार आहे. तसेच मे महिन्यातील सुट्टींच्या यादीमध्ये दुसरा आणि चौथा शनिवारसह रविवारचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्याच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मे मध्ये 'या' दिवशी बँका राहणार बंद
3 मे - रविवार असल्याने बँका बंद असतील.
7 मे - बेलापूर, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा, तिरुवनंतपूरम, कोलकाता, कोची, इंफाल, हैदराबाद, गुवाहाटी, चेन्नई, बंगळुरूमध्ये बुद्धपौर्णिमेची सुट्टी
8 मे - कोलकातामध्ये रवींद्रनाथ टागोर यांची जयंती
9 मे - दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असतील.
10 मे - रविवार असल्याने बँका बंद असतील.
17 मे - रविवार असल्याने बँका बंद असतील.
21 मे - जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद असतील.
22 मे - जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद असतील.
23 मे - चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील.
24 मे - रविवार असल्याने बँका बंद असतील.
25 मे - रमजान ईद म्हणजेच ईद- उल-फित्र असल्याने बँका बंद असतील.
31 मे - रविवार असल्याने बँका बंद असतील.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले
CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
Zoom अॅपचा वापर करता?, मग असा ठेवा आपला डेटा सुरक्षित