नवी दिल्ली- शहरी भागातून जास्त उत्पन्न मिळत नसल्यानं बँक ऑफ महाराष्ट्रनं देशभरातील 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लवकरच शाखा बंद करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरात एकूण 1900 शाखा आहेत. यापैकी महाराष्ट्राच्या शहरी भागातील 35 शाखा लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.या शाखांमधील ग्राहकांची खाती जवळच्या शाखांमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यानंतर बंद करण्यात आलेल्या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड रद्द करण्यात येतील. बंद करणा-या 51 शाखांमधील ग्राहकांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचं चेकबुक जवळच्याच बँकेत जमा करावं लागणार आहे. या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड 31 डिसेंबरनंतर रद्द होतील, अशीही माहिती समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील त्या 51 शाखांची माहिती आम्हाला मिळाली असून, ग्राहकांना ती उपलब्ध करून देत आहोत.
महाराष्ट्रातील 'या' शाखा होणार बंद- महाराष्ट्र, मुंबई, कॉटन - महाराष्ट्र, सोलापूर, सोलापूर शिवशाही- महाराष्ट्र, मुंबई, सिनिअर सिटीझन- महाराष्ट्र, कोल्हापूर, कोल्हापूर खासबाग- महाराष्ट्र, अमरावती, राजपेठ अमरावती- महाराष्ट्र, मुंबई, वांद्रे पश्चिम- महाराष्ट्र, ठाणे, अलयाली इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स- महाराष्ट्र, पुणे पूर्व, नेरे- महाराष्ट्र, पुणे पूर्व, विनझार- महाराष्ट्र, मुंबई, डॉ. अॅनी बेझंट रोड ब्रँच- महाराष्ट्र, जळगाव, गणपतीनगर- महाराष्ट्र, लातूर, पीपल कॉलेज कॅम्पस बीआर. नांदेड- महाराष्ट्र, ठाणे, एपीएमसी वाशी- महाराष्ट्र, नागपूर, नागपूर यशवंत- महाराष्ट्र, लातूर, योगेश्वरी ब्रँच- महाराष्ट्र, नाशिक, हल टाऊनशिप, ओझर- महाराष्ट्र, पुणे सिटी, पेन्शन पेमेंट- महाराष्ट्र, पुणे सिटी, ससून रोड पुणे- महाराष्ट्र, मुंबई, कॉर्पोरेट फायनान्स- महाराष्ट्र, पुणे पूर्व, एसएचजी पुणे- महाराष्ट्र, सातारा, एसएचजी सातारा- महाराष्ट्र, नागपूर, मिड कॉर्पोरेट ब्रँच नागपूर- महाराष्ट्र, सातारा, मिड कॉर्पोरेट ब्रँच सातारा- महाराष्ट्र, नाशिक, मिड कॉर्पोरेट ब्रँच नाशिक- महाराष्ट्र, ठाणे, वसई पश्चिम- महाराष्ट्र, जळगाव, दत्ता मंदिर चौक, धुळे- महाराष्ट्र, ठाणे, नालासोपारा पूर्व- महाराष्ट्र, ठाणे, विरार पूर्व- महाराष्ट्र, अमरावती, अर्जुन नगर- महाराष्ट्र, ठाणे, बोईसर- महाराष्ट्र, मुंबई, एसएचजी मुंबई- महाराष्ट्र, ठाणे, एसएचजी ठाणे- महाराष्ट्र, नाशिक, एसएचजी नाशिक- महाराष्ट्र, औरंगाबाद, एसएचजी ब्रँच- महाराष्ट्र, औरंगाबाद, एसएचजी जालना