मिदनापूर : लॉटरीची तिकिटे काढण्यासाठी पश्चिम बंगालमधील मेमारी शहरातल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील मॅनेजरने गेल्या सतरा महिन्यांत बँकेतील ८४ लाख रुपयांची चिल्लर चोरल्याचे उजेडात आले आहे.सिनिअर असिस्टंट मॅनेजर असलेला तारक जयस्वाल हा गेल्या आठ वर्षांपासून या शाखेत कार्यरत असून त्याच्या कामाबद्दल आजवर कुणाच्याच तक्रारी नव्हत्या. मात्र, त्याने बँकेच्याच पैशांवर डल्ला मारल्याचे कळल्यानंतर त्याच्या सहकाºयांना धक्का बसला आहे. तारकला लॉटरीचा नाद लागला होता.
बँकेतील रोख रक्कम सांभाळून ठेवण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्यामुळेच कोणालाही कळू न देता त्याला इतकी मोठी रक्कम लंपास करणे सहजशक्य झाले. तो दर महिन्याला १० रुपयांची ५० हजार नाणी चोरत होता. २७ नोव्हेंबरला झालेल्या वार्षिक आॅडिटमध्ये बँकेतील तिजोरीतून लाखो रुपयांची चिल्लर गायब झाल्याचे उजेडात आल्यानंतर संशयाची सुई साहजिकच तारककडे वळली.शुक्रवारी अटक केलेल्या तारकला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली आहे. (वृत्तसंस्था)‘तारक’ने दिली चोरीची कबुलीच्आपण एक ना एक दिवस पकडले जाणार याची खात्री असूनही तारक बँकेतल्या तिजोरीतले पैसे चोरत राहिला. त्याने तशी कबुलीच पोलिसांना दिली आहे. ८४ लाख इतकी मोठी रक्कम नाण्यांच्या स्वरूपात स्वत:कडे का ठेवली होती याबद्दल बँकेकडेही पोलिसांनी विचारणा केली आहे.