ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १४ - २३ मार्चपासून ते २७ मार्च असे सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेची कामे उरकायची असतील तर २३ मार्चअगोदर उरकून घ्यावीत अन्यथा २७ मार्चपर्यंत थांबावे लागेल. लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
२३ मार्चला होळी, २४ मार्चला धुलिवंदन आणि २५ मार्चला गुड फ्रायडे असल्याने बँका बंद असणार आहेत. तर २६ तारखेला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने आणि २७ मार्चला रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने अशा प्रकारे अनुक्रमे ५ दिवस बँका बंद असणार आहेत. सुट्ट्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार होणार नाहीत. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कोट्यावधींच्या क्लिअरिंग व्यवहारावर होऊ शकतो.