तुम्ही मार्च एंडिंगची कामे संपविण्याच्या मागे लागला असाल तर सावध व्हा. आधीच दोन दिवसांच्या सुट्या आणि त्यात या महिन्यात बँका 13 दिवस बंद राहू शकतात. महत्वाच्या महिन्यातच बँका बंद राहणार असल्याने सर्वांच्याच अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बँका बंद राहणार असल्याने आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर ठप्प होणार आहेत. तसेच चेक क्लिअरन्सही अडकणार आहेत. आठ मार्चला रविवार आहे. यानंतर देशभरात काही भागात 9 मार्चला तर काही भागात 10 मार्चला होळीची सुटी असते. यामुळे या दोन दिवस बँकांचे काम रखडू शकते.
11, 12 आणि 13 मार्चला सरकारी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार होतेे. यामुळे हे तीन दिवस बँका बंद राहनाार होत्या. 14 मार्चला दुसरा शनिवार आहे. यामुळे बँकांना साप्ताहिक सुटी असणार आहे. तर आठव्या दिवशी म्हणजेच 15 मार्चला रविवार असल्याने बँका बंदच राहणार आहेत.
वेतनात सुधारणा करावी या मागणीसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार होतेे. युनियन बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) आणि अखिल भारतीय बँक कर्मचारी असोसिएशनने 11 ते 13 मार्च या कालावधीत देशव्यापी संप पुकारला होोता.
बँकांच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या पगारात दर पाच वर्षांनी सुधारणा केली जाते. परंतू 2012 नंतर तसे झालेले नाही. यासह बँक संघटनांनी दोन दिवसांच्या आठवडा सुटीची मागणीही केली आहे.