पलक्कड (केरळ) - नुकत्याच झालेल्या केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने समाधानकारक कामगिरी केली आहे. दरम्यान, भाजपाने विजय मिळवलेल्या पलक्कड नगरपालिकेच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी जय श्रीराम लिहिलेला बॅनर लावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर वादाला तोंड फुटले असून, पालिका सचिवांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी नगरपालिकेमध्ये भाजपाला विजय मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यासा सुरुवात केली. या दरम्यान, काही कार्यकर्ते पलक्कड नगरपालिकेच्या इमारतीवर चढले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांचे छायाचित्र असलेला पोस्टर लावला. त्यावर जय श्रीराम असे लिहिले.त्यानंतर नगरपालिकेच्या सचिवांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आम्ही काल रात्री भादंवि. कलम यू/एस १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सुरू झाला आहे आणि हा बॅनर लावणाऱ्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.यावेळच्या केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. केरळमधील पलक्कड नगरपालिकेसह दोन नगरपालिकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. तर सुमारे २४ हून ग्रामपंचायतींमध्येही सत्ता मिळवली आहे.
केरळमधील नगरपालिकेवर फडकवला जय श्रीराम उल्लेख असलेला बॅनर, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 11:25 AM
Kerala BJP News : भाजपाने विजय मिळवलेल्या पलक्कड नगरपालिकेच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी जय श्रीराम लिहिलेला बॅनर लावल्याने खळबळ उडाली असून, पालिका सचिवांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देयावेळच्या केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली आहेकेरळमधील पलक्कड नगरपालिकेसह दोन नगरपालिकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहेतर सुमारे २४ हून ग्रामपंचायतींमध्येही सत्ता मिळवली आहे