शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे"; नव्या बॅनरने खळबळ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 14:24 IST

Akhilesh Yadav And BJP : पोलीस स्टेशनबाहेर लावलेल्या या बॅनरचा फोटो ट्विट करून सपा नेते अखिलेश यादव यांनी राज्यातील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये शुक्रवारी एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं. जेव्हा लोकांनी एका भिंतीवर एक मोठा बॅनर लावलेला पाहिला. बॅनरवर "भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे (भाजप कार्यकर्ता का ठाणे में आना मना है)" असं लिहिलं होतं. या बॅनरवर स्टेशन प्रभारी संत शरण सिंह यांचं नाव लिहिलं होतं. पोलीस स्टेशनबाहेर लावलेल्या या बॅनरचा फोटो ट्विट करून सपा नेते अखिलेश यादव (SP leader Akhilesh Yadav) यांनी राज्यातील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

'हा आहे यूपीच्या भाजपा सरकारचा बुलंद इक्बाल'

अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये  "या पाच-सहा वर्षांत पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. यूपीच्या भाजपा सरकारचा हा बुलंद इक्बाल आहे" असं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशनवर लावलेले बॅनर अन्य कोणी नसून खुद्द भाजपा कार्यकर्त्यांनी लावले होते. 

भाजपा कार्यकर्त्यांनी इन्स्पेक्टर संत शरण सिंह यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यातून त्यांच्या बदलीची मागणी केली. त्यानंतर पोलीस लाईनमधून पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या सीओने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांना शांत केले आणि पोलीस ठाण्याच्या भिंतीवरून वादग्रस्त बॅनर हटवला. मेरठचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अराजक घटक पोलिसांवर मालमत्ता रिकामे करण्यासाठी दबाव आणत होते. 

सत्ताधाऱ्यांचे नाव घेत स्वबळावर काम करबण्याच्या सूचना देत होते. पोलीस ठाण्याचे पोलीस त्यांचे म्हणणे ऐकून घेत नसताना दबाव निर्माण करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या भिंतीवर वादग्रस्त बॅनर लावण्यात आले. गोंधळ घालणाऱ्या आणि बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. व्हिडीओ फुटेजच्या आधारे पोलीस अशा लोकांची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक करतील असंही ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेश