ब्रिजटाऊन - व्हॅक्सीन मैत्री अभियानांतर्गत जगभरातील देशांना कोरोना व्हायरस लशीचे लाखो डोस मोफत दिल्यानंतर, स्वतः कोरोना लस घेतल्याने पंतप्रधाननरेंद्र मोदींचे (Narendra Modi) जगभरात कौतुक होत आहे. कॅरिबियन देश बार्बाडोसच्या (Barbados) पंतप्रधान मिआ अमोर मोटले (Mia Amor Mottley) तर या उदारतेमुळे पंतप्रधान मोदींच्या फॅनच झाल्या आहेत. त्यांनी स्वतःच ट्विट करून पंतप्रधान मोदींच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. (Barbados pm Mia Amor Mottley praised pm Narendra Modi for Corina vaccine via vaccine maitri campaign)
पंतप्रधान मोटले यांनी लिहिले आहे, 'पंतप्रधान मोदींनी स्वतः कोरोना लस घेण्याआधी बार्बाडोसमधील 40 हजार लोक आणि जगातील लाखो लोकांना व्हॅक्सीन मैत्रीच्या माध्यमाने कोविड-19 व्हॅक्सीन मिळवणे शक्य केले. हेच त्यांच्या उदारतेचे वास्तवीक दर्शन आहे. खूप-खूप धन्यवाद आणि मी आपल्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करते.' यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सोमवारी राजधानी दिल्लीत AIIMS मध्ये कोविड-19 लशीचा पहिला डोस घेतला.
IT क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्या आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार
भारताला कोरोना मुक्त करण्यात सहकार्य करण्याचे आवाहन -लस घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी भारताला कोरोना मुक्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही केले होत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले होते, की ""एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले, ते कौतुकास्पद आहे." तसेच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत आपण सर्व मिळून भारत कोरोनामुक्त बनवूयात, असेही नरेंद्र मोदीं यांनी म्हटले होते."
खूशखबर! भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन 81 टक्के परिणामकारक; सीरमच्या लसीला टाकले मागे
पंतप्रधान मोदींनी भारत बॉयोटेकच्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत बॉयोटेक कंपनीची कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतला आहे. दिल्लीतील एम्समध्ये कार्यरत असणाऱ्या पडुचेरी येथील सिस्टर पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोना लसीचा डोस दिला. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. भारतात कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच 45 वर्षे पूर्ण ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या टप्प्यामध्ये केले जात आहे.