बाराबंकी - उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 4 महिने मुलगी आईच्या मृतदेहाजवळ बसून असल्याची घटना घडली आहे. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी मुलगी आणि आई खूप दिवस दिसत नसल्याची पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला.
घराचा दरवाजा हा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर मुलगी आईच्या मृतदेहाशेजारी बसून असल्याचं दिसलं. मात्र खूप महिने झाल्याने मृतदेहाचं सांगाड्यात रुपांतर झालं होतं. पोलीस आल्यावरही मुलगी जागची उठायला तयार नव्हती. पोलिसांनी हा सांगाडा ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीची मानसिक अवस्था ठिक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसूलपूर भागातून पोलिसांना एक फोन आला. त्यावेळी व्हि. के. टंडन यांच्या घराला आतून कुलूप लावण्यात आलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे घर बंद असल्याची माहिती मिळाली. काही वर्षांपूर्वी व्हि. के. टंडन यांच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलगी दोघंच घरात राहात होते. अनेक दिवसांपासून या दोघी दिसत नसल्याने आजूबाजूच्या लोकांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांना घरामध्ये व्हि. के. टंडन यांच्या पत्नी माधुरी टंडन यांचा मृतदेह सापडला. तर त्यांची मुलगी रूची मृतदेहाजवळ बसून असलेली दिसली. मृतदेहावर ब्लँकेट आणि चादर घातली होती. या घराला बाहेरून कुलूप होतं. त्यामुळे कुलूप तोडून पोलिसांना घरात जावं लागल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल
Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल
"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"
...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
Video - कडक सॅल्यूट! 16 तास पाण्यात अडकलेल्या तरुणाची वायुदलाने अशी केली सुखरुप सुटका