बर्फ हटवणे सुरू अन् कोसळला हिमकडा; उत्तराखंडमध्ये दुर्घटना, ५७ कामगार दबले, ३२ जणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 06:33 IST2025-03-01T06:33:14+5:302025-03-01T06:33:40+5:30

डेहराडून : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गावाजवळ रस्त्यांवर साचलेला बर्फ हटविण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी आठ ...

barapha-hatavanae-saurauu-ana-kaosalalaa-haimakadaa-utataraakhandamadhayae-dauraghatanaa-57-kaamagaara-dabalae-32-janaancai-sautakaa | बर्फ हटवणे सुरू अन् कोसळला हिमकडा; उत्तराखंडमध्ये दुर्घटना, ५७ कामगार दबले, ३२ जणांची सुटका

बर्फ हटवणे सुरू अन् कोसळला हिमकडा; उत्तराखंडमध्ये दुर्घटना, ५७ कामगार दबले, ३२ जणांची सुटका

डेहराडून : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गावाजवळ रस्त्यांवर साचलेला बर्फ हटविण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हिमकडा कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) ५७ कामगार दबले गेले. त्यातील ३२ जणांचा जीव वाचविण्यात मदतयंत्रणांना यश आले आहे. अन्य ४१ कामगारांच्या सुटकेसाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.

चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, पिठोरागढ व बागेश्वर जिल्ह्यात २४०० मीटरपेक्षा उंच ठिकाणी हिमकडा कोसळण्याच्या दुर्घटना घडण्याचा इशारा चंडीगडमधील डिफेन्स जिओइन्फर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेन्ट या संस्थेने गुरुवारी संध्याकाळी दिला होता. तसेच या जिल्ह्यांतील ३५०० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचा इशारा डेहराडून येथील वेधशाळेने दिला. त्यानुसार उत्तराखंडच्या आपत्कालीन यंत्रणेने संबंधित जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते. शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत माणा व बद्रीनाथ यांच्या दरम्यान असलेला बीआरओची एक छावणीदेखील हिमकड्याच्या ढिगाऱ्याखाली दबली असल्याचे चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

३२०० मीटर उंचीवर माणा हे भारत-तिबेट सीमावर्ती क्षेत्रातील अंतिम गाव आहे.

३ किमी अंतर दूर बद्रीनाथपासून.

दुर्घटनेविषयी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी मी चर्चा केली आहे. हिमकडा कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्व कामगारांची सुटका करण्यासाठी मदतपथके सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

दबलेले कामगार कुठले?
हिमकडा कोसळून दबलेल्यांमध्ये झारखंडमधील कामगार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, दुर्घटनास्थळी बीआरओ, आयटीबीपी व अन्य यंत्रणांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

एनडीआरएफ मदतीला
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) चार मदतपथके रवाना केली आहेत. त्यापैकी दोन पथके डेहराडूनमधील एनडीआरएफच्या क्षेत्रीय प्रतिसाद केंद्रातून (आरआरसी) तर उर्वरित दोन पथके जोशीमठ येथून पाठविण्यात आली. एनडीआरएफचे महासंचालक पीयूष आनंद यांनी सांगितले की, या चार पथकांव्यतिरिक्त आणखी चार पथके सज्ज ठेवली आहेत.

नेपाळमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी चार जखमी
काठमांडू/ पाटणा : नेपाळच्या सिंधुपालचौक जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ६.१ रिक्टर स्केलचा भूकंप होऊन त्याचे धक्के काठमांडू तसेच अन्य ठिकाणी जाणवले. त्यामुळे झालेल्या दुर्घटनांत ४ जण जखमी झाले. त्याचवेळी भारतात बिहारमध्ये 
मुजफ्फरपूर, समस्तीपूर आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ५.५ रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. मात्र बिहारमध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. नेपाळमधील भूकंपाचा केंद्रबिंदू सिंधुपालचौक जिल्ह्यातील भैरवकुंडा येथे होता. 

Web Title: barapha-hatavanae-saurauu-ana-kaosalalaa-haimakadaa-utataraakhandamadhayae-dauraghatanaa-57-kaamagaara-dabalae-32-janaancai-sautakaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.