शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

TRP Scam: पुढील १२ आठवड्यांसाठी टीआरपी रेटिंग स्थगित; घोटाळा उघडकीस आल्यानं बार्कचा निर्णय

By कुणाल गवाणकर | Published: October 15, 2020 1:21 PM

TRP Scam: मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणल्यानंतर बार्कचं महत्त्वाचं पाऊल

मुंबई: टीआरपी घोटाळा समोर आल्यानं ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलनं (बार्क) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील ३ महिने टीआरपी रेटिंग स्थगित करण्याचा निर्णय बार्कनं जाहीर केला आहे. मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. यामध्ये रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं समोर आली होती.TRP Scam News: टीआरपी घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांत; तपास पथके रवानामुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात टीआरपी मोजणाऱ्या यंत्रणेशी छेडछाड करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. प्रेक्षकांना कोणते कार्यक्रम आवडतात, कुठल्या वाहिन्या कोणत्या वेळी किती कालावधीसाठी पाहिल्या जातात, याची माहिती टीआरपीमधून मिळते. टीआरपी मोजण्याचं काम बार्क करतं. त्यासाठी काही प्रेक्षकांच्या घरी एक मीटर लावलेले असतात. मात्र याच मीटरसोबत छेडछाड करण्यात आली. ज्यांच्या घरात मीटर लावण्यात आले होते, त्यांना पैसे देऊन विशिष्ट चॅनेल दिवसभर पाहण्यास सांगितली गेली, असं मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आलं. TRP Scam : 'रिपब्लिक'च्या आणखी तीन अधिकाऱ्यांची होणार चौकशी रिपब्लिक टीव्हीनं अधिक टीआरपी मिळवण्यासाठी काही जणांना पैसे दिले, असा आरोप मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर बार्कनं १२ आठवड्यांसाठी रेटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं बार्कच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र बार्कनं हा निर्णय घेताना एनबीएशी सल्लामसलत करायला हवी होती, असं एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मांनी म्हटलं आहे.'TRP घोटाळा' नक्की आहे तरी काय?... जाणून घ्या!टीआरपीनुसार जाहिरातीचा दरटीआरपीमध्ये वाढ झाल्यास त्याचा फायदा या चॅनल्सना जाहीरातीचे दर वाढवण्यात आणि व्यवसाय वाढवण्यात कामी येत असतो. आम्ही बीएआरसी या संस्थेच्याही संपर्कात आहोत आणि अधिक माहिती घेण्यात येत आहे. ही माहिती माहिती व प्रसारण मंत्रालयाला देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना तपास करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचंही परमबीर सिंग यांनी म्हटलंय. बीएआरसी या टीआरपी मोजणाऱ्या संस्थेनी दिलेल्या अहवालानुसार या रिपब्लिक चॅनलच्या रेटिंगमध्येही अविश्वसनीय अशी वाढ दिसली आहे. त्यामुळे या चॅनलचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिपब्लीक चॅनलचे संचालक आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनाही समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि आजच हे समन्स जारी केले जाणार आहे. अधिक तपास केल्यानंतर गरज पडली तर रिपब्लिकच्या संचालकांनाही चौकशीसाठी बोलावलं जाईल, असंही परमबिर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. हा प्रकार उघडकीला आला तो एका हंसा नावाच्या संस्थेच्या एका माजी कर्मचाऱ्याला अटक केल्यानंतर... हंसा कंपनीकडे टीव्हीला बॅरोमिटर लावायचं काम दिलं होतं. हे मिटर लावतानाची जी काही माहिती असते ती गुप्त ठेवली जात असते. मात्र, काही ठिकाणी पैसे देऊन हे मिटर लावले जात असल्याचा आणि एक प्रकारचं रॅकेट यात काम करत असल्याची हंसाच्या एका माजी कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिली. तक्रारींच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली होती. सखोल तपास केला असता या कर्मचाऱ्याच्या खात्यात २० लाख रूपये असल्याचं आढळून आलं. तसंच त्याच्या बँक लॉकरमध्येही साडे आठ लाख रूपये असल्याचं निदर्शनास आलं. ही सगळी रक्कम जप्त करण्यात आल्याचंही पोलिस आयुक्तांनी सांगितलं. त्या माहितीच्या आधारे तपास करून मुंबई पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. टाईम्स नाऊच्या वरिष्ठ पत्रकार मेघा प्रसाद यांनी त्यांच्या लाईव्हमध्ये सांगितलं की, अशा प्रकारे टीआरपीमध्ये घोटाळा होत असल्याच्या तक्रारी या गेल्या ३ वर्षांपासून येत होत्या आणि अशा तक्रारी फक्त मुंबई पोलिसच नाही तर इतरही काही राज्यांच्या पोलिसांकडे आल्या होत्या. देशातल्या अशा भागांत अचानक घरांचे असे काही समुह उभे राहिले जिथे लोकसंख्या अत्यंत तुरळक होती. म्हणजे छत्तीसगड, झारखंड अशा राज्यांमध्ये मोठ्या संख्येनी बॅरोमिटर्स लावण्यात आले होते. काही चॅनलच्या टीआरपीमध्ये अचानक वाढ झाली होती. ती देखील काही विशेष काही न करता... ज्या भागांत अत्यंत गरीब लोकं राहतात किंवा जिथे झोपडपट्टीसारखी वस्ती आहे.  त्या भागांत असे मिटर लावण्यात आले आणि त्या ठिकाणच्या लोकांना पैसे देऊन विशिष्ट चॅनल पाहायला लावले जात असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती. मुंबई पोलिसांनी हंसाच्या माजी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तपास केला आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला. विशेष मह्णजे ही पत्रकार परिषद गुरूवारी घेण्यात आली. गुरूवारीच बार्क या टीआरपी मोजणाऱ्या संस्थेचे देशभरातल्या चॅनलचे आकडे जाहीर केले जातात. त्यामुळे आजचाच दिवस निवडण्यात आला हे विशेष... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपब्लीक टीव्हीच्या संचालकांना आणि संपादकांना मुंबई पोलिस समन्स बजावणार आहेत. आजच हे समन्स बजावलं जाणार आहे. यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या चॅनल्सनी अशा पध्तीनी कृत्रीम पध्दतीनी टीआरपी वाढवून जाहिराती मिळवल्या, त्या जाहीतींचा पैसा हा गुन्हा  समजला जाणार आहे. रिपब्लीक चॅनलचे पत्रकार या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. याचाच अर्थ अशा प्रकारची काही तरी घटना घडली याची पूर्वकल्पना रिपब्लीकच्या कर्मचाऱ्यांना आली असेल. नाही तर सुशांत सिंह प्रकरण सुरू असताना मुंबई पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेतात, तेव्हा आपला प्रतिनिधी त्या पत्रकार परिषदेला असायला हवा, अशा भावनेनी तिथे पत्रकार पाठवला असता. एकूणच या खळबळजनक पत्रकार परिषदेमुळे वृत्त वाहिन्यांच्या विश्वासाला प्रचंड मोठा तडा गेला आहे. दोन चॅनलच्या मालकांना तर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याही विरोधात पोलिस कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचे ठरेल. कारण ज्या दोन वाहिन्यांची नावं घेण्यात आली ती अत्यंत लहान होती. पोलिस मोठ्या मासांना कधी अटक करणार असा प्रश्न निर्माण होतो.

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळाRepublic TVरिपब्लिक टीव्ही