बरेली - दहावीच्या विद्यार्थ्याने शाळेला पुलवामासारखा हल्ला करेन अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन लाखांच्या खंडणीसाठी विद्यार्थ्याने शाळेला पुलवामासारखा मोठा हल्ला करण्याची धमकी आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील शाळेत इयत्ता दहावीत शकणाऱ्या एका विद्यार्थ्याने थेट शाळेलाचं धमकी दिली आहे. दोन लाखांच्या खंडणीची मागणी करत त्याने पैसे न दिल्यास पुलवामासारखा हल्ला करण्याची धमकी दिली. विद्यार्थ्याने एक पत्र लिहून शाळेकडे तब्बल दोन लाख रूपयांची खंडणी मागितली होती. तसेच पत्रामध्ये त्याने शाळेच्या परिसरात आणि घरात बॉम्ब ठेवल्याचा दावा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शाळेचे व्यवस्थापक अनिल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या विद्यार्थ्याने रविवारी शाळेला एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये मुलाने खंडणीसाठी दोन लाखांची मागणी केली होती. जर पैसे दिले नाहीत तर शाळेत पुलवामासारखा मोठा हल्ल्याची धमकी दिली. अशा प्रकारचं धमकीचं पत्र मिळताच शाळेने पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस बॉम्ब शोधक पथकासह शाळेत दाखल झाले. पण त्यांना काहीच संशयास्पद आढळले नाही. मंगळवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्याने दोन लाखांची मागणी करणारं दुसरं पत्र लिहीलं. जर पैसे दिले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्याने पत्रात दिला.
धमकीचं दुसरं पत्र मिळाल्यानंतर शाळेने पुन्हा एकदा तातडीने पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस शाळेत दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाचा अधिक तपास करायला सुरुवात केली. तपासादरम्यान पत्र लिहिण्यासाठी वापरण्यात आलेला कागद विज्ञानाच्या वहीतून फाडल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वह्यांची तपासणी केली असता धमकी देणाऱ्या मुलाला शोधण्यात यश आले. पोलिसांनी विद्यार्थ्याची चौकशी केली असता त्याने नीट उत्तरं दिली नाहीत. दोन्ही पत्रं कोणाच्यातरी दबावात लिहिल्याची माहिती विद्यार्थ्याने पोलिसांना दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी
Devendra Fadnavis: या सगळ्यामागे कोण आहे ते माहीत्येय; फडणवीसांनी सांगितली नेमकी 'केस'
Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर
राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल
तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू