शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

भयंकर! मास्क लावला नसल्याने पोलिसांनी मुलाच्या हातापायात ठोकला खिळा; महिलेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 7:54 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : मास्क न लावणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,71,57,795 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,08,921 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,157 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,11,388 लोकांना आपला गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. अनेक ठिकाणी मास्क न वापरल्यास दंड भरावा लागत आहे. कोरोनाच्या संकटात मास्क हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

मास्क न लावणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलाने मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी मुलाच्या हातापायात खिळे ठोकल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरातली ही घटना आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मास्क लावला नाही म्हणून तीन पोलीस आले आणि आपल्या मुलाला घेऊन गेले. अनेक तास शोधल्यानंतर हा मुलगा जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकले होते. बरेलीमधल्या बरादरी भागातली ही घटना आहे. 

महिलेने आणि तिच्या कुटुंबाने याप्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी या मुलाला अटक करण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्याची आणि आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. मुलाच्या आईने पोलिसांवर हे आरोप केलेले असतानाच अधिकाऱ्यांनी मुलगा खोटं सांगत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास देखील सुरू असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मी जिवंत आहे... हे सिद्ध करण्यासाठी 'त्याला' करावी लागतेय धडपड; माराव्या लागताहेत कार्यालयाच्या चकरा

एका व्यक्तीला आपणं जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. अशोक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कारण सरकारी कागदपत्रांवर त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे. शिवकुमार अहिरवार असं या व्यक्तीचं नाव असून तो गेल्या दोन महिन्यांपासून अधिकाऱ्यांकडे जाऊन आपण जिवंत असल्याचं वारंवार सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचं काम करणाऱ्या शिवकुमारने 2018 साली राज्य सरकारच्या मुख्यमंत्री जन कल्याण संबल योजनेत आपले नाव नोंदवले होते. या योजनेद्वारा सरकार असंघटित क्षेत्राच्या उन्नतीसाठी आर्थिक मदत करते. या योजनेद्वारा मुलांच्या पालन-पोषणासाठी, मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य करते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPoliceपोलिसBiharबिहार