शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रेमाचं 'नेटवर्क' लई स्ट्राँग बुवा! फेरीवाल्याचं इंजिनिअर मुलीवर जडलं प्रेम, मग पुढं काय घडलं तुम्हीच पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 3:42 PM

प्रेमात माणूस काय करेल काही सांगता येत नाही. हल्ली आपल्या प्रेमाला मान्यता मिळवण्यासाठी किंवा प्रेयसीला मनवण्यासाठी 'शोले' स्टाईल नौटंकी करण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं दिसतंय.

प्रेमात माणूस काय करेल काही सांगता येत नाही. हल्ली आपल्या प्रेमाला मान्यता मिळवण्यासाठी किंवा प्रेयसीला मनवण्यासाठी 'शोले' स्टाईल नौटंकी करण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं दिसतंय. बरेलीतील एका फेरीवाल्यानंही आपल्या प्रेयसीसाठी असंच काहीसं केलंय. प्रेयसीसाठी एक फेरीवाला चक्क शोले चित्रपटातील वीरू बनला आणि मोबाइल टॉवरवर चढला. प्रेयसीसोबत लग्न लावून देण्याचा हट्टापायी त्यानं असं केलं. टॉवरवर चढल्यानंतर वारंवार त्यानं आपल्या प्रेयसीशी बोलणं करुन द्या अशी मागणी केली. बराच वेळ सुरू असलेल्या या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कसंबसं तरुणाची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात आलं. 

पोलिसांनी तरुणाचं समुपदेशन केलं आणि सारी कहाणी जाणून घेतली. तर गोष्ट अशीय की मोबाइल टॉवरवर चढलेला युवकाचं एका तरुणीवर प्रेम जडलं. पण ज्या मुलीवर प्रेम जडलं ती निघाली बिटेक उत्तीर्ण इंजिनिअर आणि आपले प्रेमवीर भाऊ आहे फेरीवाला. एक छोटी हातगाडी घेऊन यांचं दिवसाचं काम सुरू होतं.  याच परिसरातून येता जाता त्याला संबंधित तरुणी दिसायची आणि ह्यो पठ्ठ्या तिच्या प्रेमात पडला. मग काय पठ्ठ्या ऐकतोय व्हंय. तरुणीकडून प्रेमाची कबुली मिळवण्यासाठी थेट मोबाइलचा उंच टॉवर गाठला.

हळूहळू परिसरात बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि गहजब झाला. घटनास्थळी गर्दी जमा झाली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच तेही याठिकाणी पोहोचले. बराच वेळ पोलिसांनी तरुणाला समजावलं. त्याला खाली उतरण्याचं आवाहन केलं. शर्थीच्या प्रयत्नानंतर तरुण खाली उतरण्यास तयार झाला. पण यासाठी पोलिसांनाही युक्ती वापरावी लागली. पागल प्रेमी काही केल्या ऐकणार नाही हे लक्षात येताच पोलिसांनी संबंधित तरुणीसोबत लग्न लावून देऊ असं आश्वासन दिलं आणि कसंबसं त्याला खाली उतरण्यास प्रवृत्त केलं. पोलिसांना यात यशही आलं आणि अखेरीस त्याला अटक करण्यात आली. तरुणाच्या पालकांना बोलावण्यात आलं तर कळलं की त्याचे वडील देखील मुलाच्या कारनाम्यांमुळे आधीच वैतागलेले आहेत.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी