मुलांचे बालपण टिकविण्यासाठी साहित्याची आवड गरजेची संगीता बर्वे : १२ व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलन उत्साहात
By admin | Published: August 14, 2016 1:08 AM
जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, क्लासेस्, विविध कला शिबिरे या धावपळीत व्यस्त झाली आहेत. निरागसता हरविल्याने मुलं वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले असून ते बालपणाला मुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे टाळायचे असेल तर या मुलांना पुस्तकात खेळू दिले पाहिजे. कविता मुलांना जीवन जगविणे शिकविते त्यामुळे त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन २६व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी संमेलनाध्यक्ष तथा ख्यातनाम बाल साहित्यिक डॉ.संगीता बर्वे (पुणे) यांनी केले.
जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, क्लासेस्, विविध कला शिबिरे या धावपळीत व्यस्त झाली आहेत. निरागसता हरविल्याने मुलं वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले असून ते बालपणाला मुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे टाळायचे असेल तर या मुलांना पुस्तकात खेळू दिले पाहिजे. कविता मुलांना जीवन जगविणे शिकविते त्यामुळे त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन २६व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी संमेलनाध्यक्ष तथा ख्यातनाम बाल साहित्यिक डॉ.संगीता बर्वे (पुणे) यांनी केले.सेवादास दलुभाऊ जैन प्रायोजित बाल साहित्याला वाहिलेल्या १२व्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ बाल साहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून डॉ. संगीता बर्वे बोलत होत्या. डॉ. भवरलाल जैन सभागृहातील महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर व्यासपीठावर (अखिल भारतीय जैन संघटना सभागृह) झालेल्या या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून संघपती दलुभाऊ जैन, ११व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या उद््घाटक माया धुप्पड, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले (पुणे), एकनाथ आढाव (मुंबई), ज्येष्ठ साहित्यिक श.दि. वढोदकर, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक सतीश जैन यांनी केले. डॉ. बर्वे पुढे म्हणाल्या मोठ्यांनी मुलांना शब्दांचा घास भरवावा म्हणजे बालकांच्या मेंदूचे भरण पोषण होईल. जगण्यासाठी साहित्य, कविता खूप उपयोगी ठरते. आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांचे बालपण हरवत जाते की काय अशी भीती व्यक्त करीत मुलांचे बालपण हे साहित्यामुळे जपता येते या बाबत स्वत:चे अनुभव डॉ. बर्वे यांनी सांगितले. कवितेमुळे जीवनाची लय सापडते....कविता वाचणार्या व्यक्ती संवेदनशील असतात. त्यांना जीवनाची आंतरिक लय सापडलेली असते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना साहित्याची गोडी लावणे गरजेचे आहे. आजची मुल गप्पांऐवजी चॅटिंगमध्ये गुंतलेली दिसतात. त्यामुळे त्यांची लय हरविलेली दिसते, अशी खंतही बर्वे यांनी व्यक्त केली. खान्देशात सकस बालसाहित्याची निर्मितीउद््घाटक सुभाषचंद्र वैष्णव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बालकवी, ग.दि. माळी, प्रज्ञा पुराणिक, के. नारखेडे यांच्यासह आजच्या अनेक साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य दिले व देत आहे, त्यामुळे खान्देशातून सकस बालसाहित्य निर्माण झाल्याचे सांगून त्यांनी आजच्या बाल साहित्याबाबत विचार मांडले. या वेळी दलुभाऊ जैन, माया धुप्पड यांनीही विचार मांडले.