राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील धोरिमन्ना पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 68 वरील बोर चारणान गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुण बाईकवरून जात होते. त्याचवेळी त्यांची बाईक रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडकली. अपघातात ठार झालेले दोन्ही तरुण चुलत भाऊ होते. यातील एक तरुण तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. धोरिमन्ना पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
धौरीमन्ना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी झाला. त्यावेळी बाईकवरून दोन तरुण जात होते. त्याचवेळी मागून त्यांची बाईक रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडकली. या अपघातात दोन्ही चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. माहिती मिळताच दोघांनाही राष्ट्रीय महामार्गाच्या रुग्णवाहिकेने धौरिमन्ना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
केरिया येथील रहिवासी भरत आणि पप्पुराम विश्नोई अशी मृतांची नावं आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही वाहनं ताब्यात घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. एकाच कुटुंबातील दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच केरिया गावात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. वडील लालराम यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. टोल बुथजवळ हा अपघात झाला. महामार्गावरील टोलनाक्यासमोर उभ्या असलेल्या डंपरच्या मागे रिफ्लेक्ट लाईट लावण्यात आले नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. समोरून येणार्या वाहनामुळे, त्यातील लाईटमुळे दोन्ही तरुणांना रस्त्याच्या कडेला उभा असलेला डंपर दिसला नाही आणि ते त्यावर आदळले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.