शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

घोटाळ्याने बडोदा बँक हादरली!

By admin | Published: October 11, 2015 5:06 AM

बँक आॅफ बडोदा या राष्ट्रीयीकृत बँकेच्या दिल्लीतील अशोक विहार शाखेत बनावट कंपन्यांच्या नावे सुमारे ६,१०० कोटी रुपये मूल्याचे अमेरिकी डॉलर हाँगकाँगला पाठविले जाण्याच्या

- नबीन सिन्हा,  नवी दिल्लीबँक आॅफ बडोदा या राष्ट्रीयीकृत बँकेच्या दिल्लीतील अशोक विहार शाखेत बनावट कंपन्यांच्या नावे सुमारे ६,१०० कोटी रुपये मूल्याचे अमेरिकी डॉलर हाँगकाँगला पाठविले जाण्याच्या घोटाळ्याच्या संदर्भात संयुक्त कारवाई करीत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि गंभीर गुन्हे तपास कार्यालयाच्या (एसएफआयओ) पथकांनी शनिवारी या बँकेच्या विविध शाखांवर धाडी घातल्या. बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अधिकृत बँकिंग व्यवहारांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा हा महाघोटाळा असल्याचे समोर येत आहे. अंतर्गत हिशेब तपासणीत हे संशयास्पद व्यवहार उघड झाल्यानंतर बँकेनेच नोंदविलेल्या तक्रारीवरून ‘सीबीआय’ने शुक्रवारी प्राथमिक खबरी अहवाल (पीई) नोंदविला होता.सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या शाखा आणि खासगी संपत्तीचीही चौकशी करण्यात आली. बडोदा बँकेच्या अशोक विहार शाखेत सुमारे ५९ कंपन्यांनी उघडलेल्या खात्यांचा कसून तपास केला जात आहे. या कंपन्यांच्या खात्यांमधून हा पैसा हाँगकाँगच्या एचएसबीसी बँकेत हस्तांतरित झाला होता. या कंपन्यांनी हा संपूर्ण पैसा बँकेच्या एकट्या अशोक विहार शाखेतून वळता केला असून, ही सर्व खाती नवीन आहेत, हे विशेष. सीबीआय सूत्रांनी सांगितले की, काही कंपन्यांची नावे समोर आली असून, त्यात विक्ट्रॉक्स इंटरनॅशनल, ग्रेस अ‍ॅशियन एक्सपोर्ट, किंग विनर इंटरनॅशनल, स्टार एक्झिम लिमिटेड आदींचा समावेश आहे. परंतु या कंपन्यांमधील लोकांचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. तपास संस्थेने या प्रकरणी राजधानी दिल्लीत १० लोकांचा शोध घेतला असून, इतर काही शहरांमध्ये शोध घेतला जात आहे. या गंभीर घोटाळ्यात बँकेचे काही अधिकारीसुद्धा सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एवढ्या मोठ्या रकमेचे हस्तांतरण बँक व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या (कार्यकारी संचालक अथवा मुख्य कार्यकारी संचालकस्तरावरील) मंजुरीशिवाय शक्य नाही. शिवाय या व्यवहारात केवायसीचा नियमही धाब्यावर ठेवण्यात आला, अशी माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बहुतांश व्यवहारात १ लाख डॉलर्सपेक्षा कमी रकमेचे हस्तांतरण झाले आहे. म्हणजे अधिकाऱ्यांना असलेल्या मंजुरीच्या अधिकारांची मर्यादा पाळण्यात आली; परंतु नियमांची मात्र पूर्तता झालेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बऱ्याच प्रकरणांत बँकेतर्फे एकाच दिवशी एकाच खात्यातून तीनपेक्षा अधिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले. बँकेच्या अधिकाऱ्यांचा जाबजबाब नोंदविणे सुरू आहे.दोन अधिकारी निलंबितअशोक विहार शाखेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बँकेने तातडीने निलंबित केले असून, अंतर्गत नियमन व्यवस्थेतून एवढा मोठा घोटाळा कसा सुटू शकला, याचीही चौकशी सुरू केली आहे, असे बँकेतील सूत्रांनी सांगितले. मात्र या अधिकाऱ्यांची नावे लगेच उघड केली गेली नाहीत. विशेष म्हणजे नेहमीचा पायंडा मोडून सरकारने आधी सिटीबँकेत असलेल्या पी.एस. जयकुमार यांची बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमले आहे. जयकुमार येत्या आठवड्यात सूत्रे हाती घेणार असतानाच हा घोटाळा उघड झाला आहे.काँग्रेसने केला गौप्यस्फोेटमोदी सरकारच्या कार्यकाळात बडोदा बँकेच्या एका शाखेतून खरेदीच्या नावावर बनावट कंपन्यांच्या माध्यमाने ६ हजार १७२ कोटी रुपये हाँगकाँगला पाठविण्यात आल्याचा गौप्यस्फोट शुक्रवारी काँग्रेस पक्षाने केला होता. विशेष म्हणजे अंकेक्षण अहवालात हा गैरप्रकार उघडकीस आल्यावरही सरकारने कुठलीही कारवाई केली नाही, असे या पक्षाचे म्हणणे होते. एवढी मोठी रक्कम कुठलीही औपचारिकता पूर्ण न करता देशाबाहेर गेल्याचे दस्तावेजांवरून सिद्ध होत असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. व्यवहारांत ५०० पट वाढएकट्या अशोक विहार शाखेतून १ आॅगस्ट २०१४ ते यंदाच्या १२ आॅगस्टपर्यंत परकीय चलन परदेशात पाठविण्याचे तब्बल ८,६६७ व्यवहार होणे हे अंतर्गत हिशेब तपासात भुवया उंचावल्या जाण्याचे प्रमुख कारण होते. या शाखेतून केल्या गेलेल्या अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये वर्षभरात तब्बल ५०० पट वाढ झाल्याचे दिसून आले. वर्ष २०१४-१५मध्ये या शाखेने २१,५२९ कोटी रुपयांचे परकीय चलन विदेशत पाठविण्याचे व्यवहार केले. त्याआधीच्या वर्षी हा आकडा अवघा ४५ कोटी रुपयांचा होता. यापेकी जेमतेम ८५० व्यवहार उघड झाले.